'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 10 January 2013

आकाश पत्की ‘प्रथम’ मध्ये रुजू


निर्माण २चा आकाश पत्की प्रथमया  संस्थेत रुजू झाला असून तो प्रथम Open School’ या उपक्रमाअंतर्गत शिक्षण साहित्य विकसित करण्याची जबाबदारी सांभाळणार आहे. माध्यमिक शाळांची कमतरता, गरीबी, सतत नापास होणे, मुलींच्या शिक्षणाबद्दल अनास्था, मुलगी वयात आली की तिचे लग्न लावून देणे अशा अनेक कारणांमुळे अनेक जण आपले शालेय शिक्षणदेखील पूर्ण करू शकत नाहीत. प्रथम Open School’ या उपक्रमाअंतर्गत अशा मुलांना शालेय शिक्षण पूर्ण करण्याची तसेच रोजगारासाठी उपयुक्त कौशल्ये मिळवण्याची संधी मिळते. अशा मुलांसाठी आकाश गणिताचे शिक्षणसाहित्य विकसित करणार आहे. त्याच्या या प्रवासासाठी त्याला शुभेच्छा!

प्रथम Open School बद्दल अधिक माहितीसाठी: http://www.pratham.org/M-73-3-Pratham-Open-School.aspx

No comments:

Post a Comment