'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 10 January 2013

सिद्धार्थ प्रभुणेची छायाचित्रे झळकली 'मुसाफिर' पुस्तकात


निर्माण २ चा सिद्धार्थ प्रभुणे (शास्त्री) हा उत्तम फोटोग्राफर असल्याचे आपल्याला माहित आहेच. त्याने फर्ग्युसन कॉलेजमधून फोटोग्राफी ह्या विषयात बी. एस्सी. पूर्ण केले असून सध्या तो पुण्यातच एम.एस.डब्ल्यू. करीत आहे. पुणे महानगरपालिका कचरा कामगार युनियन प्रायोजित व अतुल पेठे दिग्दर्शित सत्यशोधकनाटकासाठीचे फोटो त्याने काढले होते. सत्यशोधक नाटकाच्या ब्रोशरवर शास्त्रीचे नाव होते, तसेच १०० व्या प्रयोगानंतर सत्यशोधकच्या निघालेल्या डी.व्ही.डी.वर सुद्धा शास्त्रीचे फोटो व नाव होते. त्याचे काम बघून अतुल पेठेंच्या एका सहकाऱ्याकडून त्याला मुसाफिर पुस्तकासाठी फोटो काढण्याबाबत विचारणा झाली. मुसाफिर हे अच्युत गोडबोलेंचे आत्मचरित्र मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केले असून ते सध्या विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहे. फोटोग्राफर म्हणून मिळालेल्या ह्या यशाबद्दल शास्त्रीचे हार्दिक अभिनंदन.

No comments:

Post a Comment