'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 10 January 2013

आयुब शेख व वर्गमित्रांची पाबळ विज्ञान आश्रमाला भेट

निर्माण ४ चा आयुब शेख व त्याचे वर्ग मित्र यांनी पाबळ ला भेट दिली व विज्ञान आश्रमाचे काम समजून घेतले. या भेटीमध्ये विज्ञान आश्रमातील एक प्रयोग ज्यामध्ये शेतकऱ्यांना पाळीव जनावरांची काळजी घेता यावी, दुष्काळाच्या परिस्थितीतही चारा देण्याची सोय व्हावी, या बरोबरच त्यांचे दुध व वजन वाढवे याकरता एझोला नावाची एक जलपर्णी वनस्पती वापरली जाते. एझोला अत्यंत कमी खर्चात व कमी श्रमात येते. या प्रयोगाचे फायदे लोकांना प्रयोगातून सिद्ध करून दाखवावे या हेतूने आयुब व त्याच्या मित्रांनी हा प्रयोग घरी करायचे ठरवले. आज हा प्रयोग आयुबकडे शेवटच्या टप्प्यात आहे. यात लवकरच त्याला यश मिळो यासाठी शुभेच्छा!

No comments:

Post a Comment