'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 10 January 2013

ग्रामीण विद्युतीकरणासाठी मयूर सरोदेचे मिशन ‘REnergize Planet’

निर्माण ४ च्या मयूर सरोदेने नागपूरच्या VNIT कॉलेज मधून मी याच वर्षी B.Tech पूर्ण केलं. त्यानंतर ६ महिने तो विज्ञान भारती या NGO मध्ये स्वयंसेवक म्हणून रुजू झाला. या संस्थेमध्ये त्यानं अपारंपारिक उर्जा स्त्रोतांच्या जागरूकतेसाठी सुरु करण्यात आलेल्या उपसंस्थेमध्ये राष्ट्रीय संयोजक म्हणून काम केलं. त्यात त्यानं ‘उर्जा इंडिया’ नावाचं राष्ट्रीय त्रैमासिक सुरु केलं. या त्रैमासिकाचे उद्घाटन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी कोलकाता येथे केले होते. याचे २ अंक त्याने काढले. ‘उर्जा वाहिनी’ नावाच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी याच विषयाची जागरूकता वाढवण्याचा कृती कार्यक्रम सुरु केला. यासोबतच गेल्या ६ महिन्याच्या कालखंडात त्याने सौर उर्जा या विषयाचा खोलात जावून अभ्यास करायला सुरुवात केली. त्यासाठी त्याने चेन्नई मध्ये REaction 2012 नावाच्या एका राष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला होता. तसंच बंगलोर मध्ये सौरउर्जे संबंधी कार्यशाळेत सहभाग घेतला होता. डिसेंबर महिन्यात त्याने या संस्थेचा राजीनामा दिला. सध्या त्याने नाशिक मध्ये ‘REnergize Planet’ नावाची स्वतःची एक Social Enterprise सुरु केली आहे. त्यामध्ये त्याने सौर उर्जेची consultancy services सुरु केली आहे. या कामासाठी त्याला निर्माणचे Resource Person सुनील चव्हाण हे मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. त्याच अंतर्गत सध्या तो शोधग्राम मध्ये सोलर पॉवर प्लांट टाकण्याच्या एका प्रोजेक्टवर काम करतो आहे. वाढते वीजबिल आणि वाढत्या डिझेलच्या किंमती यांमुळे शोधग्राम मध्ये होणाऱ्या विजेच्या खर्चावर यामुळे बऱ्याच प्रमाणात मात करता येणार आहे. या कंपनीच्या मार्फत त्याला “ग्रामीण विद्युतीकरण” चे एक Business Model बनवायचे आहे.

No comments:

Post a Comment