'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 13 February 2013दिलगिरी
सीमोल्लंघन, डिसेंबर २०१२ च्या अंकात ‘सिध्दार्थ प्रभुणेची छायाचित्रे झळकली मुसाफिर पुस्तकात’ ही बातमी प्रकाशित झाली होती. या बातमीत सिध्दार्थने काढलेली ‘सत्यशोधक’ या नाटकाची छायाचित्रे पाहून अतुल पेठेंच्या सहकाऱ्याने त्याला ‘मुसाफिर’ साठी संधी दिली असे लिहिण्यात आले होते. मात्र सिद्धार्थने दिलेल्या माहितीनुसार त्याला ही संधी अच्युत गोडबोलेंच्या सहकारी दीपा देशमुख यांनी दिली होती. घडलेल्या चुकीबद्दल सीमोल्लंघन दिलगीर आहे.

No comments:

Post a Comment