'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 13 February 2013

संतोष गर्जेच्या कार्याला आनंदवन मित्रमंडळाच्या सहयोगातून मारुती कारची देणगी


निर्माण ४ चा संतोष गर्जे बीड मधील गेवराई येथे सहारा अनाथालय चालवत आहे हे आपल्याला माहिती आहेच. मुलांना शाळेत आणणे, सोडणे तसेच सामान ने-आण करणे ह्यासाठी त्याला अडचण जाणवत होती. त्यावर उपाय व त्याच्या कार्यास मदत म्हणून पुण्यातील अॅडव्होकेट श्री. व सौ. परळीकर ह्यांनी सहारा अनाथालयाला मारुती कारची देणगी दिली. हे जुळवून आणण्यात आंनदवन मित्रमंडळाचा  मोठा वाटा होता.
आनंदवन/सोमनाथ येथे श्रमसंस्कार शिबिरांत सहभागी झालेल्या किंवा समाजाबद्दल संवेदनशील असलेल्या लोकांचा एक गट, आनंदवन मित्रमंडळ, पुण्यात कार्यरत आहे. विविध सामाजिक कार्यांना आवश्यक संसाधने, वर्गणी, कपडे इ. जमा करून त्या संस्थांना आपापल्या परीने मदत करणे असे ह्या गटाच्या कामाचे स्वरूप आहे. मंडळाच्या ह्याच कार्यक्रमांतर्गत संतोष गर्जेला मारुती कार देण्यात आली.
पुण्यातील लोकांसाठी ह्या निमित्ताने मदत करण्याचा एक मोठा मार्ग निर्माण झाला आहे. आपल्या घरी असलेले जादा सामान, कपडे, भांडी, धान्य इत्यादी वस्तू दर रविवारी सकाळी ११ ते ७ ह्यावेळात पुण्यातील केसरीवाड्यात जमा करता येतात. ह्या वस्तू नंतर गरजेप्रमाणे विविध गरजू संस्थांना देण्यात येतात.  आनंदवन मित्रमंडळ बद्दल अधिक माहितीसाठी संपर्क साधा: संदीप बर्वे -  ९८६०३८७८२७ 

No comments:

Post a Comment