'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

अमरावती गट विविध उपक्रमांद्वारे कृतीशील


निर्माण, प्रयास, सेवांकुर, धडकमोहीम, i2h व अर्थक्रांती अशा विविध माध्यमांतून एकत्र आलेला अमरावतीच्या युवांचा गट विविध कृती-कार्यक्रमांद्वारे सक्रीय होत आहे. ‘तपोवन’ येथील शिबिरात एकमेकांशी ओळख झाल्यानंतर तपोवनातच वृक्षारोपणाचा कार्यक्रम या गटाने हाती घेतला. त्यानंतर या गटातील तरुण महिन्यातील एका रविवारी एकत्र येऊन पुढचा कृती कार्यक्रम ठरवतात. अशाच एका कार्यक्रमाअंतर्गत या गटाने अमरावतीच्या मराठी माध्यमाच्या तसेच झोपडपट्टी व मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले. प्रदर्शनात स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, पर्यावरणाचे संवर्धन अशा गंभीर विषयांवर मुलांनी चित्रे काढली. दरम्यान गटाला वेळोवेळी ‘प्रयास’चे अविनाश सावजी, ए.सी.पी. श्रीकांत महाजन यांचे मार्गदर्शन मिळत गेले. पोलिसांना व्यवस्थित समजून घेता यावे यासाठी या गटाने शालेय विद्यार्थ्यांसोबत पोलीस स्टेशन व जेलला अभ्यासभेट दिली, तसेच गटातील मुलींच्या वसतीगृहात श्री. श्रीकांत महाजन यांचे ‘मुलींनी स्वतःचे संरक्षण कसे करावे’ या विषयावर सत्र आयोजित केले. 
गणेशोत्सवातील प्रदूषणाला लगाम घालण्यासाठी निर्माल्य संकलन व पोस्टर प्रदर्शनाद्वारे जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला. ३१ डिसेंबरला पोलिसांच्या सहकार्याने  प्रत्येक सिग्नलवर येणाऱ्या गाड्यांना ‘Don’t drink and drive’ असा संदेश देणारे स्टिकर चिकटवण्यात आले.
अमरावती गटाला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 

No comments:

Post a Comment