'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वर्धा गटाची अभिनव होळी


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असणारी होळी साजरी करण्याच्या हेतूने वर्ध्यातील विविध सेवाभावी संस्थांमार्फत गेल्या १९ वर्षांपासून अनिष्ट रूढींना फाटा देऊन वेगळ्या पद्धतीने धुलीवंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळीदेखील सकाळी ग्रामसफाई, सामुहिक ध्यान व त्यानंतर वर्ध्याच्या प्रमुख रस्त्यांवरून प्रभातफेरी काढण्यात आली. यामध्ये भजनांच्या गजरात चौकाचौकात प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजिले होते. या सर्व कार्यक्रमांत मंदार देशपांडे (निर्माण ४), हर्षल झाडे, कल्याणी राउत, गोपाल गावंडे, मानसी अंबारे, अनुप गोहत्रे, भूषण देव (सर्व निर्माण ५)  यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
या गटाने होळीसाठी वनसंपत्तीचा वापर न करणे, पाणीविरहीत होळी साजरी करणे व होळीच्या अनिष्ट चालीरीती दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प केला.

No comments:

Post a Comment