'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

संतोष व जयश्रीची एमकेसीएल फेलोशिप साठी निवड

निर्माण २ चे संतोष व जयश्री हे त्यांच्या मन्याळी गावात गेली २-३ वर्षे नेटाने ग्रामविकासाची कामे करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने गावात दारूबंदी, श्रमदानातून विहीर खणणे, शोष खड्डे करणे, नर्सरी सुरु करणे तसेच घरपोच धान्य योजना, घरोघरी  शौचालय बांधणे अशी अनेक कामे उभी राहिली आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांची एमकेसीएलच्या दुष्काळ निवारण व ग्रामविकास फेलोशिपसाठी निवड झाली आहे. फेलोशिपचा कालावधी ३ ते ५ वर्ष असून ह्यामध्ये गावातील विविध विकासात्मक कामांसाठी मार्गदर्शन व तज्ञांची मदत देण्यात येणार आहे.  संतोष व जयश्रीला त्यांच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!

No comments:

Post a Comment