'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

निर्माणच्या चमूची खानदेशातील सामाजिक संस्था, व्यक्ती व निर्माणींसोबत भेट


सायली तामणे, संदीप देवरे व निर्माणचे मार्गदर्शक सुनील चव्हाण यांनी नुकतेच खानदेशातील विविध संस्था व व्यक्तींना भेटी दिल्या. त्यामध्ये जळगाव येथील  श्री. नरसिंह परदेसी, श्री. किशोर पाटील, ‘जळगाव महिला असोसिएशनच्या सौ. वासंती दिगे व परिवर्तन नाट्यसंस्थाआणि सांगडसंघटनेचे श्री. शंभू पाटील ह्यांच्याशी भेट झाली. जळगाव महिला असोसिएशन गेली अनेक वर्ष स्त्रियांच्या हक्कासाठी लढते आहे. स्त्रीभ्रूण हत्या, ऑनर किलिंग अश्या अनेक प्रकरणांविरोधात असोसिएशन काम करते आहे. परिवर्तन नाट्य संस्था विविध सामाजिक प्रश्नांवर नाटकाचा माध्यमातून जनजागृतीचे काम करत आहे. तसेच सांगड हे संगठन विविध परिवर्तनवादी चळवळीतील संघटनांच्या कार्यकर्त्यांचा दुवा म्हणून काम करीत आहे.

एरंडोल येथे काम करीत असणाऱ्या डॉ. संग्राम व डॉ. नुपूर पाटील ह्यांनादेखील ह्या गटाने भेट दिली.  ह्या दोघांनीही यु.के. येथे शिक्षण घेतले असून गेली ४ वर्ष ते जळगाव जवळील एरंडोल येथे अत्यंत कमी पैशात वैद्यकीय सेवा देत आहेत. एरंडोल जवळच असलेल्या बहादरपूर ह्या गावी निलिमा मिश्रा (Magsaysay पुरस्कार विजेत्या) बचतगटामार्फत कर्ज पुरवणे व गावातील महिलांकडून गोधड्या शिवून त्या परदेशी निर्यात करणे ह्या माध्यमातून ग्रामविकासाचे काम करीत आहेत. नुकतेच त्यांनी गावांमध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचे काम देखील हाती घेतले असून सरकारी मदत न घेता केवळ गावातील लोक व संस्थेच्या पैशातून ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. बहादरपूरनजीकच चोपडा ह्या गावी श्री. चंद्रकांत पाटील ह्यांच्या अमरसंस्थेमार्फ़त बालकाश्रम, वृद्धाश्रम, मुलांसाठी हॉस्टेल, पुस्तकांची पेढी, कपड्यांची बँक, शाळा इ. प्रकल्प गरजू  लोकांसाठी राबविले जात आहेत.
ह्या चमूने धुळे जिल्ह्यातील श्री. अजय चांडक ह्यांच्या सुमन फौंडेशनला आणि श्री. महेंद्र वाडे व श्री. सिद्धार्थ जगदेव ह्यांच्या बहुजन हितायह्या संस्थेला भेट दिली. सुमन फौंडेशन हे मुखत्वे विविध पर्यायी उर्जांवर काम करत असून - सोलर कुकर, सोलर ड्रायर, बायोगस इ. उपकरणे विकसित करण्यात व विविध संस्थांना उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान आहे. श्री. सिद्धार्थ जगदेव ह्यांची सत्यशोधक विद्यार्थी संघटनाविद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काम करीत आहे. तसेच बहुजन हिताय ही संस्था मागासवर्गीय लोकांमधून उद्योजक निर्माण करण्याचे काम करीत असून फुलांची शेती, दोरखंड बनवणे अश्या प्रकारचे अनेक उद्योग संस्थेमार्फत केले जातात. 
            तसेच या गटाची निर्माणच्या शिल्पा  कासार, प्रतीक्षा जंगम, पूजा वारुळे, केतन सोनार, ज्ञानेश मगर, सचिन महाले, उदयसिंह चव्हाण यांच्यासोबतही भेट झाली.

No comments:

Post a Comment