'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

अद्वैत दंडवते व अंबादास कुसाळकर यांचे ७ खेड्यांमध्ये अर्थशास्त्रीय सर्वेक्षण सुरू


खेड्यातील लोकांचा विविध संस्था/व्यक्तींसोबत असणारा सामाजिक/आर्थिक परस्परसंबंध व लोकांचा विकास यांच्यातील सहसंबंध शोधत आहेत अद्वैत दंडवते (निर्माण ४) व अंबादास कुसाळकर (निर्माण ५).
दिल्ली विद्यापीठाच्या Center for Development Economics द्वारा प्रायोजित Delhi School of Economics, University of Essex University of York च्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली Project NoPoor अंतर्गत हे सर्वेक्षण ३ राज्यांमध्ये करण्यात येणार आहे. पैकी महाराष्ट्रातल्या ११ जिल्ह्यांतील प्रत्येकी एका गावातल्या १०० घरांचे सर्वेक्षण होणार आहे. अद्वैत अकोला, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तर अंबादास चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांतील गावांच्या सर्वेक्षणासाठी प्रादेशिक पर्यवेक्षक असणार आहे. 

No comments:

Post a Comment