'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

जयश्री गवळे (कलंत्री) ने एक गाव निवडून केली ग्रामविकासाच्या कार्यास सुरुवात


संतोष गवळे याने जसे मन्याळीची निवड करून ग्रामविकासाचे काम केले, त्याचप्रमाणे आता पिंपळगाव(वन) या गावात जयश्रीनेही ग्रामविकासाचे काम सुरु केले आहे. उमरखेड तालुक्याहून ३२ किमी अंतरावर असणारं दिडशे कुटुंबांचं हे जंगलालगतचं गाव. या गावात दारूच्या ३५ हातभट्या होत्या. ठाणेदार देवकते यांनी पुढाकार घेऊन गावातील दारू विक्री व हातभट्ट्या गेल्या वर्षी बंद केल्या. दारूचे प्रमाण कमी झाले तरी गावातील इतर समस्यांवरही काम करणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी जयश्री व संतोषला यांना पिंपळगाव येथे काम करण्याची विनंती केली. 

पिंपळगावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही गावकऱ्यांची गरज आहे हे लक्षात आल्यावर जयश्रीने या समस्येवर काम करण्यासाठी सुरुवात केली आहे. गावातल्या पाणी समस्येचं कारण म्हणजे वनविभागाने पाईपलाईनला नाकारलेली परवानगी. पैनगंगा नदी व पिंपळगावच्या मध्ये २ किमी जंगल. नदीवर बंधारा असल्याने बंधाऱ्यास पाणी मुबलक. पण वनविभाग, गावातलं राजकारण यामुळे गाव तहानलेलं. जयश्रीने पाईपलाईनसाठी मंत्रालयातून परवानगी मिळवली असून लोकवर्गणीतून हा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. अशा तऱ्हेने पिंपळगावातील पाणीप्रश्न मार्गी लागल्यामुळे ग्रामविकासाला सुरुवात झालेली आहे. 

No comments:

Post a Comment