'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

मेळघाटच्या आदिवासी मुलांसाठी i2h तर्फे करीअर मार्गदर्शनाची कार्यशाळा


कुपोषणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या मेळघाटची शिक्षणा-साठीही फारशी ख्याती नाही. शिक्षणाची खालावलेली गुणवत्ता व योग्य त्या मार्गदर्शनाच्या अभावामुळे इथली मुले मागं पडत असल्याचे निरीक्षण मेळघाटात कार्यरत असणाऱ्या डॉ. प्रियदर्श तुरेने नोंदवले. १०वी-१२वी नंतर मेळघाटच्या  मुलांना पुढील शिक्षणाच्या अनेक शक्यतांची ओळख व्हावी या दृष्टीने नुकतेच Investment in Humans (i2h) व आदिवासी विकास आयुक्तालयाने एकत्रितपणे करीअर मार्गदर्शनाची कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेत कला, वाणिज्य, कृषी,  व्यवस्थापन, वैद्यकीय, अभियांत्रिकी या शाखांबद्दल तसेच पोलीस व सैन्य भरती, स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, फॉर्म कसे भरावेत, कोठून मिळवावेत या बाबतीतही मार्गदर्शन करण्यात आले.
जरीडा आश्रमशाळेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत ४ आश्रमशाळांचे सुमारे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते. अमरावती गटाने ही कार्यशाळा यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.

No comments:

Post a Comment