'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

मुंबई गटाची IPH भेट


            श्रेयस गोडबोले, गौरव तोडकर, अमृता ढगे व क्रांती डोईबळे यांनी डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या Institute for  Psychological Health (IPH) या स्वयंसेवी संस्थेला भेट दिली. सर्वांसाठी मानसिक आरोग्यहे ब्रीद असलेल्या IPH मध्ये कमी खर्चात सर्व मानसिक रोग्यांचे उपचार केले जातात. या भेटीनिमित्त तणावाखालील रुग्णांना  टेलिफोनिक हेल्पलाईनद्वारा समुपदेशन देणारा मैत्रव स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना आपली उपजीविका स्वतः कमावण्याची संधी देणारा त्रिदलहे उपक्रम पाहण्याची संधी मिळाली. 

No comments:

Post a Comment