'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 5 April 2013

World sparrow day निमित्त

मी सिद्धार्थ प्रभुणे. दि.२० मार्च रोजी (World sparrow day) माझे मित्र अमेय जगताप व बाबा पाटील व मी संभाजी बागेत चिमण्यांकरता ५० घरे बसवली व ‘save a bird -gift a home project’ हा उपक्रम सुरु केला. डॉ.अनिल अवचट यांच्या हस्ते घर बसवून या पकल्पाची सुरवात झाली.  याअंतर्गत पुण्यात १००० चिमण्यांची घरे बसवायचा आमचा संकल्प आहे. तसेच काही कॉलेजेसबरोबर मिळुन आम्ही स्थानिक-देशी झाडे लावण्यास सुरवात केलेली आहे. तुम्हाला शक्य तेथे  पक्ष्यांकरता धान्य, पाणी ठेवा, घरे बसवा, झाडे लावा व पक्षीमित्र बना असे आम्ही आवाहन करतो.

No comments:

Post a Comment