'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 13 June 2013

बालकांना आंनद व किशोरींना जीवनशिक्षण: हृतगंधा देशमुखकडून दोन शिबिरांचे आयोजन

औरंगाबाद येथे दि ४ ते ९ मे या कालावधीत हृतगंधा देशमुख (निर्माण ४) व तिच्या सहकाऱ्यांनी आनंद विहारकिशोरी जीवन कौशल्यअशा दोन शिबिरांचे आयोजन केले होते. आनंद विहारया शिबिरात ३ ते १२ वर्षाच्या मुलांसाठी चित्रकला, बाल चित्रपट, कोलाजकाम, बौद्धिक खेळ, सुंदर हस्ताक्षर, मैदानी खेळ, व्यायाम, अभिनयपर गोष्टी इ. गोष्टी घेण्यात आल्या. किशोरी जीवन कौशल्यशिबिरात जीवन कसे जगावे, आरोग्य व आहार, करिअर मार्गदर्शन, योग, स्वयंरोजगार, महिलाविषयक कायदे इ. विषयांबरोबरच रांगोळी, मेहंदी, निबंध, चित्रकला, मैदानी स्पर्धा घेण्यात आल्या. विशेष म्हणजे यातील जीवन कसे जगावे व आरोग्य सत्र वगळता उर्वरित सत्रे हृतगंधा व टीमनेच घेतली.
 शिबिरातील मुलींच्या समस्यांविषयी निरीक्षण नोंदवताना ऋतगंधा म्हणाली, “हालखीच्या परिस्थितीमुळे १५-१६ वर्षे वर्षांच्या दोन मुलींचा बालविवाह झालेला होता. त्यांना साधारणपणे दीड वर्षांचे मूल होतं. याशिवाय लोक आपल्याकडे बघतात या भीतीने मुलींना मैदानी खेळ खेळण्यात अडचण वाटत होती. किशोरींमध्ये होणारे बदल व आरोग्य याविषयी मनपा शाळेत खूपच त्रोटक माहिती दिली जात असून याविषयी मुलींमध्ये जागृती करण्याची गरज आहे.

  या शिबिरांच्या निमित्ताने प्रथमच अशा प्रकारच्या शिबिराची समन्वयक म्हणून काम करण्याची संधी महानगरपालिका औरंगाबाद, ‘ग्रामविकाससंस्था संचलित ‘DAY CARE CENTER, नारेगावMIDC औरंगाबाद यांनी हृतगंधाला दिली.

No comments:

Post a Comment