'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 13 June 2013

निखिल मुळ्येचे ‘प्रगती अभियान’सोबत रोजगार हमी योजनेवर काम सुरु

निखिल मुळ्ये (निर्माण ५) याने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या फेलोशिप अंतर्गत प्रगती अभियानसोबत नाशिक येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पेठ, ईगतपुरी व त्र्यंबक या तीन तालुक्यातील सुमारे ५० आदीवासी गावांचे त्याचे कार्यक्षेत्र असेल. याअंतर्गत सदर गावांमध्ये योजनेचे काम योग्य प्रकारे राबवले जाते की नाही याची पाहणी करणे, अडचणी असल्यास त्यावरती उपाययोजना करणे आणि गरीब, मजूर लोकांमध्ये या योजनेविषयी जागृती करुन त्यांना काम मिळवून देणे असे कामाचे स्वरुप असेल.

प्रगती अभियानबद्दल अधिक माहितीसाठी: http://www.pragatiabhiyan.org/  

No comments:

Post a Comment