'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 11 July 2013

मन्याळी व पिंपळगावचा आता नियोजनबद्ध विकास

गावविकास (कृती) आराखडा तयार
गावात कोणत्या समस्या आहेत? गावकऱ्यांच्या गरजा कोणत्या? त्या कशा पूर्ण करायच्या? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी संतोष व जयश्री गवळे यांनी गावाचे सूक्ष्म नियोजन करून गावाचा विकास आराखडा तयार केला आहे. सूक्ष्म नियोजनाची ५ दिवसांची ही प्रक्रीया यशदापुणे या शासकीय संस्थेने विकसित केलेली आहे. या प्रक्रियेदरम्यान यशदाचे ५ प्रशिक्षक सहा दिवस गावात मुक्कामी राहिले होते.
यावेळी गावांतील प्रत्येक कुटुंबाची इत्यंभूत माहिती जमा करण्यात आली. शिवार फेरी, महिला सभा, वॉर्ड सभा, तरूण मुला-मुलींच्या सभांतून अनेक समस्यांची/ गरजांची यादी तयार करण्यात आली. समस्या व गरजांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला व कृती आराखडा ठरवण्यात आला. शेवटच्या दिवशी विशेष ग्रामसभेत सर्व समस्यांची गाव पातळीवर सोडवायच्या समस्या, पंचायत समिती स्तरावर, तहसील स्तरावर, जिल्हास्तरावर सोडवण्यात येणार्या् समस्या अशी विभागणी करून ग्राम सभेत ठराव मंजूर करण्यात आले. या सभेसाठी कृषी विभाग, वन विभाग, आरोग्य, शिक्षण, विद्युत, तलाठी, ठाणेदार आदी गावाशी संबंधित सर्व कर्मचारी/अधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ यांचे विशेष सहकार्य मिळाले. श्री. शेजाळ यांनी स्वत: सरपंचाच्या अध्यक्षतेखाली व इन कॅमेरा ही ग्रामसभा घेतली. पिंपळगावची ग्रामसभा सायंकाळी ६.१५ ला सुरु होऊन रात्री १० पर्यंत चालली. याबाबत संतोषने पाऊस पडत असतानाही शाळेत घेतलेल्या या ग्रामसभेत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. ग्रामसभा का व कशासाठी असते हे पहिल्यांदा समजल्याचे मत अनेक गावकर्यां नी मांडले.असे निरीक्षण  नोंदवले. 
पाच दिवसाच्या या प्रक्रीयेत मशाल फेरी, ग्रामस्वच्छता अभियान, फिल्म, पथनाट्य, प्रभात फेरी याद्वारे अनेक विषय गावकर्यांयपर्यंत पोहचले गेले. रोजगार हमी, सामाजिक अर्थ सहाय्य यासारख्या अनेक शासकीय योजना गावकर्यांरना समजल्या. सर्व विकास आराखडा बनवण्यात गावांचा सहभाग असल्याने विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल या दोन्ही गावात पडले आहे.  

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नियोजन

मन्याळी व पिंपळगावातील यावर्षीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनच्या (MKF) सहकार्याने नियोजन  करण्यात येत आहे.
पडणारे पावसाचे पाणी व शेतीसाठी लागणारे एकूण पाणी, पिकाचे नियोजन, भूजल पाणी साठा व पाण्याचा प्रवाह  आदीचा अभ्यास चालू असून दोन्ही गावांत महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनच्या वतीने पर्जन्यमापक बसविण्यात आले आहे व दैनंदिन पावसाच्या नोंदी घेणे चालू आहे.
भूजल पातळीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने GPS चा वापर करून विहिरीची स्थिर भूजल पातळी दर पंधरा दिवसाला काढण्यात येत आहे. वर्षभराच्या अभ्यासानंतर बंधारे कुठे बांधायचे हे निश्चित करण्याबरोबरच जमिनीतील खडकाचा प्रकार, कुठली पिकं घेणे शक्य आहे आदी बाबी समजणार आहे. यासाठी संतोष व जयश्री गवळे यांना MKFच्या वतीने दोन वेळा ट्रेनिंग देण्यात आले आहे.    

स्त्रोत- संतोष गवळे, sgawale05@gmail.com

2 comments:

  1. I had got a chance to visit Santosh's village. I am fortunate enough to have him as my friend. :)

    ReplyDelete