'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 10 July 2013

अद्वैता वर्तक पाबळ विज्ञान आश्रमात रुजू

अद्वैता वर्तकने (निर्माण ५) नुकतेच ३ जून पासून विज्ञान आश्रम पाबळ येथे प्रोग्राम मनेजर / कोऑर्डीनेटर म्हणून कार्यभाग स्वीकारला. अद्वैता ही कला शाखेची पदवीधर असून ह्यापूर्वी ती कॅप जेमिनी ह्या कंपनीत काम करीत होती.
            विज्ञान आश्रम ही नई तालीम पद्धतीने चालणारी तरुणांसाठीची शक्षणिक संस्था असून फूड टेक्नोलोजी, गोपालन, शेती, वेल्डिंग, कॉम्प्युटर्स इत्यादी अनेक कौशल्ये येथे तरुणांना शिकविली जातात व उद्योजकतेसाठी त्यांना तयार केले जाते. तसेच विज्ञान आश्रम विविध शाळांमधूनही आय.बी.टी. (Introduction to basic technology) हा सरकारमान्य कार्यक्रम राबविते. ह्या कार्यक्रमांतर्गत शाळेतील ८वी, ९वी व १०वी ह्या वर्गातील मुलांसाठी वरील कौशल्ये शिकविणारे वर्ग घेतले जातात. ह्या आय.बी.टी. प्रोग्राम्सचे सर्व समन्वयन, डॉक्युमेंटेशन व मूल्यमापनाचे काम अद्वैता सध्या बघत आहे. तसेच विज्ञान आश्रमाच्या अंतर्गत मासिकाचेदेखील काम ती करणार आहे. तिला तिच्या पुढील कामासाठी शुभेच्छा !
आय.बी.टी. बद्दल अधिक माहितीसाठी पाहा - http://www.vigyanashram.com/Inner/InnerPages/RDES_IBT.aspxस्रोत  अद्वैता वर्तक  adwaita289@gmail.com

1 comment: