'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 17 September 2013

मयूर सरोदेचे ग्रामीण विद्युतीकरणाचे मिशन सुरु

१७ ऑगस्टला नाशिक पासून सुमारे २५ किमी. अंतरावर असलेल्या वंजारवाडी गावातील माजी सरपंचांच्या घरात मयूर सरोदेने (निर्माण ४) REnergize Eco-Planet Pvt. Ltd. या आपल्या कंपनीमार्फत सोलर प्रणाली install केली. पहिल्या installation च्या माध्यमातून मयूरच्या व्यवसायाला मूर्त स्वरूप आले आहे.
या प्रणाली मध्ये ५ Watt चे २ Super Bright LED दिवे असून त्यासाठी २० Watt सोलर पॅनेल, १२ Volt २० Amp-Hour Battery, ५ Amp Charge Controller यांचा वापर केला आहे. याशिवाय विजेच्या धक्क्यापासून संरक्षण व्हावे म्हणून शहरात केली जाते तशी संपूर्ण बंद अशी wiring आणि switch board arrangement केली आहे.
त्यानंतर पुढच्या आठ दिवसात मयूर व सहकारी ३ वेळा त्यांच्या घरी install केलेली सोलर प्रणाली पाहण्यासाठी आणि त्यांचा Feedback ऐकण्यासाठी गेले होते. त्याचबरोबर त्यांच्या काही नातेवाईकांना आणि गावातील काही जणांना सोलर प्रणालीचं प्रात्यक्षिक पण दाखवलं गेलं. त्यापुढील २–३ दिवसातच वंजारवाडी आणि लहवित या गावांमधील आणखी काही गावकऱ्यांनी त्यांच्या घरात सोलर दिवे लावण्याविषयी विचारणा केली. काही घरांमध्ये ६ तर काही घरांमध्ये ९ दिव्यांची प्रणाली बसवण्याचे ठरले आहे.
सध्या मयूरने गावातल्या घरांसाठी सोलर प्रणाली ची Customized Design पद्धती स्वीकारली आहे. यात गावकऱ्यांना घरांमध्ये किती दिवे हवे आणि ते किती वेळ चालू राहावे याचा एक अंदाज बांधला जातो. त्यानुसार प्रणालीचे प्रात्यक्षिक त्यांना आधीच दाखवले जाते. त्यामुळे प्रकाशाची तीव्रता आणि लांबी याचा त्यांना बऱ्यापैकी अंदाज येतो. त्यांनी सांगितलेल्या माहिती प्रमाणे सोलर प्रणाली ची design करून त्यांच्या घरावर install केली जाते.
            मयूरला त्याच्या कामाबद्दल जरूर feedback द्या.

स्त्रोत- मयूर सरोदे, mayursarode17@gmail.com

No comments:

Post a Comment