'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 17 September 2013

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा ‘वर्धिष्णू’कडून निषेध

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ जळगावमधील पुरोगामी संस्थांनी मिळून निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये भरारी फौंडेशन, डॉ. संग्राम पाटील व सहकारी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनमुक्ती संघर्ष वाहिनी, जळगाव जिल्हा महिला असोसिएशन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यासोबत अद्वैत दंडवते (निर्माण ४) व सहकाऱ्यांची ‘वर्धिष्णू’ही सहभागी झाली होती. मुखर्जी उद्यानापासून सुरू होऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विसर्जित झाला. विसर्जित होण्यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली वाहण्यात आली व त्यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान अद्वैत आणि सहकाऱ्यांनी हत्येच्या तपासाला वेग यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण केले.

स्त्रोत- अद्वैत दंडवते, adwaitdandwate@gmail.com  

No comments:

Post a Comment