'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

जलव्यवस्थापनात उच्च शिक्षणासाठी सचिन तिवलेला मानाची शिष्यवृत्ती !

सचिन तिवले (निर्माण १) याला UNESCO-IHE Institute of  Water Education  या नेदरर्लॅंडमधील विद्यापिठात M.Sc in Water Management या दीड वर्षाच्या नामांकित अभ्यासक्रमाकरता प्रवेश मिळाला आहे.  ही संस्था पाणी क्षेत्रात शास्त्रीयदृष्ट्या शिक्षण देणारी आणि संशोधन करणारी जगातील सगळ्यात मोठी संस्था मानली जाते. या अभ्यासक्रमाकरिता सचिनला रोटरी फौंडेशनची Rotary Scholarship for Water and Sanitation Professional ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. ही शिष्यवृत्ती विकसनशील देशातील पाण्यासंबंधित प्रश्नांवर काम करणाऱ्या mid-career professionals ना दिली जाते. पहिल्यांदाच ही स्कॉलरशिप भारतीय व्यक्तीला देण्यात आली आहे. ही संस्था Water policies, water governance, water and sanitation issues, equitable distribution of water इ. विषयांवर काम करते.
यापूर्वी सचिनने Urban water policies and issues या विषयावर ‘प्रयास’ या संस्थेसोबत काम केले आहे तसेच छत्तीसगढमध्ये Watershed management या विषयावर काम केले आहे. सचिनचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील प्रवासाकरता शुभेच्छा!
UNESCO-IHE Institute of  Water Education  बद्दल अधिक माहितीकरिता: http://www.unesco-ihe.org/?gclid=CIzC_MK5hLoCFe-E4godO2IA1g

स्त्रोत- सचिन तिवले, sachin.tiwale@gmail.com   

No comments:

Post a Comment