'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

दक्षिण आशियातील शांतता, लोकशाही आणि आव्हाने

शांती परिषदेत सागर पाटील व अद्वैत दंडवतेचा सहभाग

वीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने “Pakistan India Peoples’ Forum for Peace and Democracy” [PIPFPD] चे राष्ट्रीय अधिवेशन २० ते २२ सप्टेंबर २०१३ दरम्यान गांधी स्मृती दर्शन समिती, नवी दिल्ली येथे संपन्न झाले. “दक्षिण आशियातील शांतता, लोकशाही आणि आव्हाने” हा अधिवेशनाचा विषय होता. अधिवेशनात भारतातील १३ राज्यांतून १५० व पाकिस्तानातून ५ प्रतिनिधींची उपस्थिती होती.
अधिवेशनातील पाकिस्तान व भारतातील सामाईक समस्यांवर एकत्रित उपाय काय होतील यासंदर्भात खालील मुद्द्यावर मांडणी झाली:
१] अतिरेकी कोण व त्यांना काय हवे
२] शस्त्रसंधी व loc वरील लोकांचे जीवन
३] मच्छिमारांचे प्रश्न
४] आर्थिक नीती व जागतिकीकरणाचा दोन्ही देशांवर परिणाम
५] उर्जा धोरण
६] व्हिसा प्रक्रिया शिथिलीकरणासंदर्भात मागणी.
            अधिवेशनात पुढील ठराव मांडण्यात आले
१] दक्षिण आशियात निश:स्त्रीकरण
२] काश्मीर मधून सैन्य मागे घेणे
३] प्रसारमाध्यमातून प्रश्नांना योग्य दिशा व मांडणी
४] दक्षिण आशियात शांतता व लोकशाही बळकटीकरण
५] दोन्ही देशातील सामान्य जनतेत संवादाची सुरवात होण्यासाठी प्रयत्न करणे
            याशिवाय अधिवेशनात गझल व दास्तान हे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यात भारत पाकिस्तान फाळणी हा विषय होता. त्या सोबत “DREAMING TAJ MAHAL” हा पुरस्कार विजेता माहितीपट प्रदर्शित झाला.
            अधिवेशनाच्या शेवटी नवीन सदस्यांची नेमणूक झाली. त्यात महाराष्ट्रातील जतीन देसाई, पुष्पा भावे, अन्वर राजन व शेखर सोनाळकर यांचा सहभाग होता. निर्माण तर्फे सागर पाटील (निर्माण ५) व अद्वैत दंडवते (निर्माण ४) यांही सहभाग नोंदविला.  

स्त्रोत : सागर पाटील, sgpatil4587@gmail.com

No comments:

Post a Comment