'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

मेळघाटातील कुपोषणग़्रस्त भागात काम करण्यासाठी धडक मोहिमेत अनेक निर्माणींचा सहभाग

आरोग्य तपासणी करताना डॉ. पवन मिल्खे
मेळघाटातील चिखलदरा भागात मागील वर्षी कुपोषण व बालमृत्यूंचे प्रमाण लक्षात घेता २०१३ धडक मोहिमेचे आयोजन चुनख़डी, घाना, नवलगाव, ख़डीमल, बिबा, चोबिता, लाखेवाडा या गावांत करण्यात आले. डॉ. पवन मिल्खे, डॉ. धीरज देशमुख (दोघेही निर्माण ३), डॉ. प्रेरणा राऊत (निर्माण ४), अश्विनि येरलेकर आणि कल्याणी राऊत (दोघी निर्माण ५) यांनी धडक मोहिमेत सहभाग घेतला. कोरकू आदिवासींच्या या गावांत पावसाळ्यानंतर pneumonia आणि diarrhea मुळे अनेक लहान मुले गंभीर आजारी पडतात आणि काही दगावतात देखील. गरोदर स्त्रिया, feeding mothers आणि ०-६ वयोगटातल्या मुलांची काळजी, वैद्यकीय तपासणी आणि वेळेत उपचार हा मोहिमेमागचा उद्देश होता. याबरोबरच शाळेतील मुलांसोबत स्वच्छ्ता अभियान (plastic हटाओ गाव बचाओ) राबवण्यात आले. लसीकरणाचे महत्त्व, मुलांमधले अंतर किती, कसे व का असावे या बाबत महिती व चर्चा करण्यात आली. अती पावसामुळे शेतीचे फार नुक्सान झाल्याने लोक कामाच्या शोधात गावाबाहेर पडले पण काम न मिळ्याल्याने परतल्याचे लक्षात आल्यामुळे रोजगार हमी योजनेबाबतची महिती त्यांना नाटकाद्वारे देण्यात आली.
धडक मोहिमेबद्दल बोलताना कल्याणी म्हणाली, “प्रामुख्याने आरोग्य केन्द्राचे कर्मचारी उपलब्ध नसल्याने लोकांपर्यंत प्रथमोपचार पोचत नाहीत. लोक भगताकडून उपचार करुन घेतात. काही शाळांचीदेखील फार वाईट अवस्था आहे, मुले आहेत पण मास्तर नाही, पुस्तकांची प्रिंट उलटी. या लोकांकडे पाहून या त्यांच्या समस्या नसून हेच त्यांचे आयुष्य आहे का? हीच त्यांची मजबुरी आहे का? असा प्रश्न पडला..” 

स्त्रोत- कल्याणी राउत- kalyaniraut28888@gmail.com

No comments:

Post a Comment