'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

पुण्यामध्ये महाराष्ट्र सोशल ऑलिम्पियाडची पहिली कार्यशाळा संपन्न

कार्यशाळेत सादरीकरण करताना प्रफुल्ल
महाराष्ट्र नॉलेज फौंडेशनच्या महाराष्ट्र सोशल ऑलिम्पियाड (MOS) ह्या प्रकल्पाची पहिली कार्यशाळा पुण्यातील बायफ येथे संपन्न झाली. ५वी ते १०वी ह्या वयोगटातील मुलांना समाजातील विविध प्रश्नांच्या सामोरे नेणे व छोट्या छोट्या समाजाभिमुख कृती करण्यास प्रोत्साहित करणे असे सोशल ऑलिम्पियाडचे स्वरूप आहे. ह्या प्रकल्पासाठी १६ गटांची नोदणी झाली असून, ह्या गटांना मार्गदर्शन करण्यासाठी एकूण १२ गाईड्स नेमण्यात आले आहेत. तसेच निर्माणचे ८ volunteers ह्या सर्व गटांशी संपर्कात राहून त्यांना लागेल ती मदत करणार आहेत. 

MOS च्या कार्यशाळेसाठी सर्व गटांचे प्रतिनिधी, गाईड्स व निर्माणचे volunteers उपस्थित होते. कार्यशाळेची  सुरुवात 'Do flowers fly' ह्या छोट्या फिल्मने  झाली. आजच्या शिक्षण पद्धतीवर ही फिल्म अत्यंत मार्मिकपणे टिप्पणी करते. त्यांनतर विविध उपस्थित गटांनी MOS बद्दलची त्यांच्या अपेक्षा व MOS ची गरज ह्याबद्दल चर्चा केली. तसेच दुपारच्या सत्राला पुढील ६ महिन्यांचे प्लानिंग व कुठले प्रोजेक्ट करता येणे शक्य आहे त्यांची यादी केली. 

MOS च्या गटांच्या कामाचे पहिले प्रेझेंटेशन जानेवारीत होणार असून मे मध्ये दुसरे प्रेझेंटेशन होणार आहे. ह्या दोन्ही प्रेझेंटेशन्सच्या आधारे गटांना सामूहिक बक्षिसे देण्यात येतील. 


 स्रोत : प्रफुल्ल वडमारे - prafulla.wadmare@gmail.com

No comments:

Post a Comment