'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

मोजमाप व विल्हेवाट निर्माल्याची

निर्मल ग्राम निर्माण केंद्रात याही वर्षी निर्माल्य संकलन
नाशिकपासून ८ किमी अंतरावर गंगापूर मध्ये निर्मल ग्राम निर्माण केंद्र ही संस्था मागील ३० वर्षे कचरा व्यवस्थापनावर काम करते. या संस्थेतर्फे मागील ४ वर्षांपासून “निर्माल्य दान अभियान” हा उपक्रम राबवला जतो. त्यामध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी विसर्जन करायला जाणाऱ्या लोकांना निर्माल्य दान करण्याचे आवाहन केले जाते, त्यांनी दान केलेले निर्माल्य एका ठिकाणी एकत्र केले जाते व त्याचे वर्गीकरण करून मोजमाप केले जाते. याही वर्षी निर्माल्य संकलानाचा उपक्रम उत्साहात पार पडला. त्यामधून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळया प्रकारचे सामान गोळा झाले. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे:

सामान
वजन/संख्या
विल्हेवाटीची पद्धत
सामान
वजन/संख्या
विल्हेवाटीची पद्धत
पानं, फुलं, दूर्वा
१५०० किलो
खत
कागद
५० किलो
पेपर पल्प
नेवैद्य / प्रसाद
१०० किलो
गोबर गॅससाठी
प्लास्टिक
६० किलो
कचरा गोळा करणाऱ्या मावशींना देण्यासाठी
नारळे
१७५
कार्यकर्त्यांना  वाटण्यासाठी
देवांचे फोटो
८०
पाहुण्यांसाठी डिस्प्ले (पाहुणे हवे असल्यास घेवून जाऊ शकतात)
खोबर्‍याच्या वाट्या
१०
तेल काढून मुलांना रोजगार
मूर्ती
५०
धान्य
३०  किलो
धुवून व शिजवून गाईंना देण्यासाठी
वस्त्रे
पेंटिंगचा canvass
फळे
२०० किलो
कार्यकर्त्यांना  वाटण्यासाठी
थर्मोकोल, प्लास्टिकच्या झिरमिळ्या, डेकोरेशनची मखरे
घंटागाडी
सुपाऱ्या
२ किलो
खत
कापराच्या डब्या, अत्ताराच्या बाटल्या, उदबत्त्या व वाती
?
बदाम
१ किलो
तेल काढून मुलांना रोजगार
           
            या कार्यक्रमात रश्मी कुलकर्णी, मयूर सरोदे, आकाश भोर, वैभव दहिफळे, व मुक्ता नावरेकर हे निर्माणचे युवक युवती देखील यामध्ये सभागी झाले होते. 
या उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया देताना आकाश भोर म्हणाला, “एकट्याचं निर्माल्य नदीत टाकताना काही वाटत नाही, पण सगळ्याचं मिळून ते एवढया मोठया प्रमाणात एकाच ठिकाणी पाहून जाणीव झाली की हा प्रश्न किती गंभीर आहे. त्यात प्लास्टिकचे प्रमाणही खूप जास्त होते. निर्माल्य नदीत टाकू नये हे माहित होतं, पण इथं निर्माल्य गोळा करून त्याचं वर्गीकरण करताना निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावण्याचं काम आपलंच आहे ह्या जबाबदारीची प्रखरतेने जाणीव झाली.”

स्त्रोत : आकाश भोर- akashdbhor@gmail.com

No comments:

Post a Comment