'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

मनोहर शेखावतचे सुमित्रा भावे व सुनिल सुखटणकरांसोबत काम सुरु

मनोहर शेखावतचे (निर्माण ५) नुकतेच सुमित्रा भावे व सुनील सुखटणकरांसोबत  काम सुरु झाले आहे. सुमित्रा भावे व एम.के.सी.एल. ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 'माझी शाळा' नावाची एक मालिका सह्याद्री वाहिनीवर १३ ऑक्टोबर पासून प्रसारित होणार आहे. रचनावादी शिक्षण व त्याचे सर्व आयाम, सर्व स्तरातील आविष्कार व त्यांचे विश्लेषण हा ह्या मालिकेचा गाभा आहे. मूळ मुंबईचा असणारा मनोहर सध्या ह्या मालिकेसाठी Direction Trainee म्हणून काम करत आहे. त्याचा कामाचा भाग म्हणून त्याला script coordination, management, continuity supervision अशी वेगवेगळी कामे त्याला पहावी लागतात. तसेच Indira Gandhi National Open University मधून तो बी. ए करणार आहे. 

त्याला त्याच्या नवीन कामासाठी हार्दिक शुभेच्छा ! 


स्रोत: मनोहर शेखावत – manoharsinghs9@gmail.com

No comments:

Post a Comment