'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

उत्तर महाराष्ट्रातील गटाची पहिली भेट !

१९ सप्टेंबरला  निर्माण प्रक्रियेशी जोडलेल्या उत्तर महाराष्ट्रातील मित्र मैत्रिणींची एक बैठक नाशिकला निर्मल ग्राम निर्माण केंद्रात झाली. प्रगती अभियानच्या अश्विनी कुलकर्णी आणि नाशिक, धुळे, जळगाव येथील काही जण या बैठकीला उपस्थित होते. प्रत्येकाची ओळख, कामाविषयी अनौपचारिक चर्चा झाली. अश्विनी ताईंनी प्रत्येकाच्या कामात काही महत्त्वाच्या गोष्टी सुचवल्या. त्यानंतर 'आपण सगळ्यांनी वारंवार भेटावं, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर चर्चा करावी, वाचलेली पुस्तके, आलेले अनुभव याची देवाणघेवाण करावी' असं सगळ्यांनाच वाटलं. साधारण दीड महिन्यातून एकदा एकत्र जमावं असं ठरलं. पुढची भेट १० नोव्हेंबरला धुळ्याला आहे. उत्तर महाराष्ट्रातील शक्य त्या सर्वांना संपर्क करण्यचा प्रयत्न करत आहोत. ज्यांना आवड आणि सवड असेल त्यांनी जरूर या. 
स्त्रोत : मुक्ता नावरेकर- muktasn1@gmail.com

No comments:

Post a Comment