'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

प्रियंका यादवच्या रिसर्च पेपरची Population Association of America च्या वार्षिक conference साठी निवड

प्रियंका यादव (निर्माण ५) सध्या Jawaharlal Nehru University (JNU) मध्ये शिकत असून तिच्या रिसर्च पेपरची Population Association of America - New Orleans च्या वार्षिक conference मध्ये पोस्टर प्रेझेंटेशनसाठी निवड झाली होती. “Addressing Unmet Need for Spacing and its Implications on Fertility: Need for Family Planning in India” असे तिच्या पेपरचे शीर्षक होते.  तिच्या JNU मधील कामाबद्दल हा पेपर होता. भारतातील गर्भनिरोधाकांची गरज का भागत नाही आहे ह्याचे तिने विश्लेषण केले होते. तसेच ती गरज भागल्यास त्याचा लोकसंख्येवर कसा परिणाम होईल ह्याची तिने आकडेवारी सादर केली. उत्तर भारतातील बऱ्याच राज्यामध्ये हा प्रश्न अधिक गंभीर आहे असेदेखील तिने सिद्ध केले. 

Population Association of America च्या धोरणानुसार भाग घेणाऱ्यांना अमेरिकेतील दोन विद्यापीठे फिरण्यासाठी, तेथील व्यवस्था, अभ्यास, संशोधन व प्राध्यापकांना भेटण्यासाठी आर्थिक तरतूद केली जाते. ह्या संधीचा फायदा घेऊन प्रियांकाने Princeton University World Bank ला भेट दिली. तेथे श्री. कौशिक बासू  (वर्ल्ड बँकेचे मुख्य अर्थतज्ञ) व त्यांच्या पत्नीला भेटण्याचा तिला योग आला. तसेच त्यावेळी वर्ल्ड बँकेमध्ये होणाऱ्या  "Breaking the Silence"  ह्या, ‘दक्षिण आशियातील लैंगिक हिंसाचार’ ह्या विषयावरच्या परिसंवादात देखील तिला सहभागी होता आले. 

अशीच अजून एक संधी प्रियांकाला मिळाली ती Brown University व  Santander University ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेच्या रूपाने. ही कार्यशाळा दोन आठवड्यांची असून त्यात जगभरातील २५ संशोधकांना बोलावण्यात आले होते. त्यात प्रियांकाच्या कामाची दाखल घेऊन तिला देखील निमंत्रित करण्यात आले. प्रियांका तेथे सहभागी झालेल्या संशोधकांपैकी वयाने सगळ्यात लहान होती. कार्यशाळेचा विषय Population and Development: 
New Approaches to Enduring Global Problems असा होता.

सातारा जिल्हा प्रशासनाने नुकतेच नकोशी / नाकुसा नावाच्या साधारण तीनशे मुलींचे नवीन नामकरण केले. ह्या पार्श्वभूमीवर प्रियांकाचे अजून एक उल्लेखनीय काम म्हणजे तिने साताऱ्यातील विविध डॉक्टर्स, पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून, तेथील परिस्थितीचा अभ्यास करून, Excess female child mortality (मुलींबद्दल भेदभाव केल्यामुळे, दुर्लक्ष केल्यामुळे होणारे मृत्यू) व Sex selected female mortality (मुलगी असल्यामुळे केलेली हत्या) ह्यांचे प्रमाण estimate करून त्याबद्दल विविध ठिकाणी संवाद साधला. 
प्रियांकाचा संशोधन निबंध वाचण्यासाठी: http://paa2013.princeton.edu/abstracts/131735   
स्रोत : प्रियांका यादव  - yadavpriya123456@gmail.com


No comments:

Post a Comment