'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 22 October 2013

मयूर सरोदेचा Tech For Seva परिषदेत सहभाग

२८-२९ सप्टेंबर, २०१३ रोजी पुणे येथे आयोजित केलेल्या Tech For Seva या परिषदेत मयूर सरोदेने सहभाग नोंदवला. या परिषदेत प्रामुख्याने Academic Institutes, Ccorporate Ssocial Responsibility (CSR) Departments आणि Non-Ggovernmental Oorganizations असे ३ वर्ग सहभागी झाले होते. CSR विभागाकडे संसाधने, academic institutes कडे तांत्रिक उपाय तर NGOs कडे समाजातल्या विविध प्रश्नांची चांगली समज असते. या परिषदेची संकल्पना म्हणजे या तिन्ही वर्गांनी एकत्र येऊन एकमेकांना समजून घेऊन पूरक काम करावे अशी आहे. या परिषदेत १८ राज्यांमधील एकूण ८४९ जणांनी भाग घेतला होता.
“Household Electrification through solar energy in rural and tribal region of India” या विषयाचा पेपर मयूरने या परिषदेसाठी लिहिला होता. परिषदेत वाटण्यात आलेल्या “Abstract Book” मध्ये तो प्रसिध्द करण्यात आला. या पुस्तकाचे उद्घाटन अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले आणि परिषदेची सांगता भारताच्या पहिल्या महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या भाषणाने झाली. याच विषयांतर्गत Poster Presentation मध्ये सुद्धा मयूरने भाग घेतला होता.
सप्टेंबर महिन्यामध्ये REnergize Eco-Planet Pvt. Ltd. या स्वतःच्या कंपनीतर्फे मयूरने वंजारवाडी आणि लहवित या नाशिकजवळील गावांमध्ये अनुक्रमे २ व १ घरगुती सोलर लाईटिंग प्रणाली बसविल्या आहेत. या प्रणालींमध्ये ६ आणि ९ दिवे वापरले जाऊ शकतात. वंजारवाडी या गावामध्ये आठवड्यातून चार दिवस १४ तास तर तीन दिवस ८ तास भारनियमन असते. तसेच लहवित या गावामध्ये सुद्धा सुमारे ६ तास रोज भारनियमन असल्याने सोलर प्रणालींचा गावांना नक्कीच उपयोग होईल.


स्त्रोत- मयुर सरोदे, mayursarode17@gmail.com

No comments:

Post a Comment