'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Thursday, 21 November 2013

अश्विन भोंडवेचे ज्ञान प्रबोधिनीच्या Education Resource Center सोबत काम सुरु

            सर्च बरोबर तीन वर्ष काम केल्यानानातर शिक्षण व माहिती तंत्रज्ञान या दोन क्षेत्रांची सांगड घालून शिक्षण क्षेत्रात काय काम करता येईल, चांगल्या शिक्षकांचा आणि शैक्षणिक साहित्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाची काय मदत घेता येईल असे प्रश्न अश्विन (निर्माण ३) च्या मनात होते. या प्रेरणेतून त्याने २० सप्टेंबर २०१३ पासून ज्ञान प्रबोधिनी, पुणे सोबत त्यांच्या Education Resource Center (ERC) या कार्यक्रमावर काम सुरु केले.
शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांना प्रत्यक्ष भेटी, वाचन, चर्चा असा त्याचा हा अभ्यास चालू आहे. याच बरोबर रिसोर्स सेंटरच्या वेबसाईट मधील तांत्रिक बाबींमध्ये अश्विन मदत करतो.  त्याचे हे शिक्षण श्री विविक पोंक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
ERC बद्दल अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्यावी - http://erc-pune.org


स्रोत : अश्विन भोंडवे, ashwin.bhondave@gmail.com

No comments:

Post a Comment