'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 24 January 2014

गोपाळ महाजन व अजय होले ह्यांचा ‘काम मांगो अभियाना’त सहभाग

मेळाव्यात मार्गदर्शन करताना गोपाल
काही वर्षांपासू राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने (रोहयो / नरेगा) अंतर्गत कामाचा आढावा पाहता असे निदर्शनास आले की राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात निधीचे वितरण झालेले नाही. त्यामुळे नरेगामार्फत ग्रामी विकास कामे पूर्ण होणे ग्रामीण गरीबी दू होणे हा उद्देश यशस्वी होण्यामध्ये कुठेतरी शासन कमी पडते आहे असे चित्र समोर आले. त्याची काही कारणे समोर आली ती खालीलप्रमाणे आहेत
१.      लोकांमध्ये जनजागृतीची कमी.
२.      लोकांमध्ये काम मागितले तर मिळेल असा विश्वास नाही
मेळाव्यात मार्गदर्शन करताना अजय
या दोन समस्यांवर प्रयोगशील कार्य करावे ह्या हेतुने काम मांगोची संकल्पना उदयास आली भारतातील सहा राज्यांतून हा प्रयोग करण्याचे ठरविले गेले. स्वयंसेवी संस्था/संघटनांमार्फत चांगले काम होवू शकते हे लक्षात घेऊन काम मांगो अभियान ही संकल्पना प्रामुख्याने दिल्ली सरकार डू पुढे आली.
या प्रयोगासाठी सहा राज्यांतील सहा जिल्ह्यांची निवड करण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याचा समावेश होता. नाशिकमधील प्रगती अभियान ह्या संस्थेने हा प्रयोग राबविण्याची जबाबदारी उचलली. ह्या प्रकल्पामध्ये निर्माणचे गोपाळ महाजन व अजय होले सहभागी झाले.
सरपंच व ग्रामसेवक मेळावा
 ह्या अभियानांतर्गत, कलेक्टरसोबत मीटिंग आयोजित कऱण्यात आल्या स्थानिक संस्था/संघटनांनाही या कामात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले गेलेसंरपंच ग्रामसेवक मेळाव्याचे आयोजन, भित्तीपत्रक, हॅंडबील, पुस्तिका असे साहित्य लोकांना घराघरात जाऊन देणे, रोहयोची माहिती पोहचवणे असे ह्या अभियानाचे स्वरूप होते.

स्रोत गोपाळ महाजन, mahagopsu@gmail.com  

No comments:

Post a Comment