'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Monday, 13 January 2014

चॉकलेट पार्सल - ६

प्रिय युवा मित्रांनो,
आपण ज्या काळात जगत आहोत त्यात ‘स्पर्धा व विषमता ही आर्थिक प्रगतीसाठी प्रोत्साहवर्धक असते’ असे बरेचदा मानले जाते. हे गृहीतक खरे आहे का? नंदा खरे यांनी ‘स्पिरीट लेव्हल’ या पुस्तकाचा परिचय नुकताच निर्माण ५.३ अ शिबिरात करून दिला. विषमता व तिच्यासोबत आढळणारे दुष्परिणाम यांचा अनेक देशांचा अभ्यास या पुस्तकात मांडला असून ‘समाज कसा हवा’ याविषयी काही दिशा दर्शन त्यातून मिळावे. तो वाचा.
बियाण्यांवर सत्ता कोणाची असावी? हा प्रश्न शेतकरी तसेच अन्न खाणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा. डॉ. तारक काटे यांचा लेख (आजचा सुधारक) व त्यावर झालेला चर्चा संवाद.
विनोबा हे अक्षरशः शिक्षण ऋषी होते. भारतासाठी योग्य अशी नई तालीम शिक्षण पद्धती गांधीजींनी प्रथम मांडली. तिचा विकास विनोबांनी केला. निर्माणमध्ये आपण ती काही प्रमाणात वापरतो. नई तालीमबद्दल स्वतः विनोबांच्या शब्दांत.
नरेंद्र दाभोलकरांचा बळी गेल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित झाला. पण शेवटी त्या कायद्यात कोणत्या गोष्टी गुन्हा ठरविल्या आहेत? चित्ररूपाने पहा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुस्तिकेतून.
जे वाचता त्यावर प्रतिक्रिया काय?

नायना


या पार्सलमध्ये:

No comments:

Post a comment