'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 24 January 2014

अमृता वाकोडेचे महानगरपालिकेच्या शाळेसोबत काम सुरु

Cognizant कंपनीत काम करता करता अमृता वाकोडेने Corporate Social Responsibility अंतर्गत महापालिकेच्या शाळेत काम केले. तिचे अनुभव तिच्याच शब्दांत...
“माझे नाव अमृता वाकोडे (निर्माण ५). निर्माण ५.१ शिबीर झाल्यापासून शिक्षण क्षेत्रात काम करायची माझी इच्छा होती. मी Cognizant कंपनीत काम करते. मला कंपनीतील "outreach" या पोर्टलबद्दल कळलं. याअंतर्गत कंपनी ७-८ महानगरपालिकेच्या शाळा दत्तक घेते. त्यांना आवश्यक सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकांसोबत बोलून त्यांना वैज्ञानिक उपकरणे, Projector, क्रीडा साहित्य . उपलब्ध करून दिले जातेतसेच ह्या शाळांमधील मुले इंग्रजी, विज्ञान आणि गणित ह्या विषयांमध्ये इतर शाळांतील मुलांपेक्षा मागे असतील तर कंपनीतील इच्छुक लोकांना Volunteer म्हणून शिकवता येतंयात एकाच वर्गाला ३-४ वर्षे सलग शिकून त्याचे वेळोवेळी मूल्यमापन केले जाते.
       
मी नागू बारणे मुलींची शाळा इथे गेले महिने प्रत्येक शनिवारी जाते आहे. तिथे चौथ्या वर्गाला English शिकवते आहे. पहिले काही दिवस बरेच Volunteers असायचे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या इच्छेनुसार न् पद्धतीने शिकवायचे. जिथे मुलीना a, b, c..alphabets पण ओळखता येत नाहीत तिथे त्यांना spellings शिकवत. मला ते पटत नव्हतं. ज्यासाठी आम्ही तिथे जात होतो, त्याचा तिथल्या मुलींना काहीच फायदा होत नाही असं जाणवलं. म्हणून मग त्या वर्गाची जबाबदारी मी घ्यायची ठरवली.
        
आता त्या मुलींना पहिले मराठी लिहिणे वाचणे शिकवणे सुरु केले आहे. त्यांना नवीन आणि वेगळं काही शिकायला मिळतंय असं वाटलं, तर त्या चांगला प्रतिसाद देतात. हे माझ्या लक्ष्यात आल्यावर त्यांना जास्तीत जास्त pictorial presentations आणि games मधून कसा शिकवता येईल यासाठी प्रयत्न करते आहे. थोडं कठीण जातंय, पण मजा येतेय.

स्रोत अमृता वाकोडे, amruta.wakode@gmail.com

No comments:

Post a Comment