'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 24 January 2014

उद्योजकता प्रशिक्षणासाठी निर्माणींची जागृती यात्रा

जागृती यात्रेदरम्यानचा क्षण
वाढती स्पर्धा, संसाधनांची कमतरता यामुळे कोणत्याही नवीन उद्योजकाला सहजी सहजी यश मिळत नाही. शासनस्तरावर काही संस्था उद्योजकतेचे कागदोपत्री शिक्षण देतात, पण ती उद्योजकता प्रत्यक्षपणे कशी सुरु करायची याचे practical शिक्षण मिळण्याची कुठेच सोय नाही. २०२२ पर्यंत १ लाख उद्योजक व १० लाख नोकऱ्या घडवण्याच्या ध्येयाने ६ वर्षांपूर्वी सुरू झालेली "जागृती यात्रा" याही वर्षी संपन्न झाली. यावर्षी जागृती यात्रेत निर्माणचे सदानंद कुरुकवाड, संतोष गवळे, श्वेता वानखेडे, चिंतामणी पवार, अनिरुद्ध ढगे, सारंग जेवळीकर सहभागी झाले होते.
१५ दिवसांच्या या रेल्वे यात्रेत २०-२७ वयोगटातील ४५० युवा प्रतिनिधींनी ८००० किलोमीटर प्रवास करून विविध क्षेत्रातल्या मापदंड समजल्या जाणाऱ्या भारतातील व्यक्तींना भेट दिली व त्यांच्याशी संवाद साधला. मुंबईत यात्रेकरूंना ज्योती म्हापसेकर व पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन लाभले. तिथून धारवाडला भिंतीविना शिक्षण देणारे नयी तालीमवर आधारलेले कलगेरी संगीत कला विद्यालय; मदुराईला गरजूंना माफक दरात दुष्टी मिळवून देणारे अरविंद आय केअर; चेन्नईला IITमधून शिक्षण घेऊन शेती करणारे माधवनजी; जलव्यवस्थापन व त्याद्वारे आदर्श गाव तयार केलेले ओरिसातले जो माडियथ; वृक्षसंवर्धनासाठी काम करणारी पाटण्यातली तरूमित्र’; दिल्लीत गूंजसंस्थेमार्फत गेली १५ वर्षे जुने कपडे, पुस्तके व इतर साहित्य गोळा करून गरजूंना मोफत वाटणारे अंशू गुप्ता; राजस्थानमधील तिलोनियामहिलांच्या सक्षमीकरणासाठी सोलार तंत्रज्ञान देणारे बंकर रॉय आणि शेवटी साबरमती आश्रम अशा प्रवासानंतर मुंबईतच जागृती यात्रा विसर्जित झाली.
जागृती सेवा संस्थानया मुंबईस्थित स्वयंसेवी संस्थेमार्फत दरवर्षी जागृती यात्रेचं आयोजन करण्यात येतं. एका प्रश्नावलीद्वारे तरुण तरुणींची निवड करण्यात येते. विविध व्यक्ती/संस्था यांच्यासोबत भेटीशिवाय रोज presentations व गटचर्चा होतात. त्यासाठी रेल्वेतच दोन डब्यांमध्ये टीव्ही, माईक यांची सोय असते. रोज रात्री मुक्काम रेल्वेतच असतो. २०१४ च्या जागृती यात्रेची निवडप्रक्रिया लवकरच सुरू होईल.

जागृती यात्रेबद्दल अधिक माहितीसाठी: http://www.jagritiyatra.com/  

स्त्रोत : सदानंद कुरुकवाड, skurukwad@gmail.com   

No comments:

Post a comment