'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 24 January 2014

वारली दिल्लीत !

सायली वाळके (निर्माण ) सध्या MLD Trust मार्फत विक्रमगड तालुक्यातील वारली कलाकारांसोबत काम करत आहे. अतिशय कुशल सक्षम असे हे कारागीर, पण फक्त market बरोबर जोडलेले नसल्याने त्यांच्या ह्या कलेतून त्यांना पुरेशी उपजीविका मिळत नाही. Weakest Link ची संकल्पना आपण निर्माण शिबिरात ऐकली आहे. सायलीने नेमकी हीच कच्ची कडी ओळखून त्यावर काम सुरु केले आहे. त्यांची कला जोपासता जोपासता, फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारता आणि नंतर परदेशातही त्यांच्या कलाकृती पोहोचवण्याचा तिचा मानस आहे. त्यादृष्टीने पहिले पाऊल दिल्लीच्या प्रदर्शनात पडले.
आपल्या कालाकृतींसह वारली कारागीर
दोन कारागीर आणि त्यांच्या विविध कलाकृतींनी भरलेले १२० किलोचे ६ मोठे बॉक्स यांच्यासह सायली दिल्लीस  पोहोचली. दिल्लीतील दस्तकर नामक संस्था भारतातील पारंपारिक कला तिच्याशी निगडीत कारागिरांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. अशा कला जिवंत ठेवणे या कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणे हा संस्थेचा उद्देश आहे. अशा कलाकृतींचे एक प्रदर्शन त्यांनी दिल्लीत आयोजित केले होते. त्यामार्फत वारली आदिवासींची पारंपारिक कला दिल्लीपर्यंत पोहोचवता आली.
या अनुभवाबद्दल बोलताना सायली म्हणाली, ठाणे किंवा मुंबईच्या बाहेर कधी गेलेल्या त्या कारागीरांसाठी दिल्ली हे एक अप्रूपच होते. रेल्वेस्थानकावर आपला माल ताब्यात घेण्याकरिता करावी लागणारी धडपड, agentने केलेला फसवण्याचा प्रयत्न, इथपासून ते दिल्लीची कधीही अनुभवलेली थंडी, वेगळी भाषा, निराळे जेवण, मेट्रोचा प्रवास इथपर्यंत सर्वच वेगळे होते’. प्रदर्शनात विक्री तर छान झालीच पण त्यापेक्षा अधिक शिकायला खूप मिळाल्याचे कारागीरांनी सांगितले. देशातील इतर राज्यात कुठल्या कला प्रचलित आहेत ह्याचे अनेकविध पैलू त्यांना पाहायला मिळाले. शेजारच्याच stall मध्ये तिहार मधील कैद्यांनी केलेल्या handmade कागदाच्या कलाकृती सादर केल्या होत्या. झारखंडमधील कलाकारांनी सुकलेला दुधीभोपळा किती आकर्ष करता येतो हे दाखवून दिले होते. अशा एक ना अनेक कलाकृती पाहून त्यांचे खूप समाधान झाले आणि नवीन कलाकृती (products) तयार करण्याकरिता खूप नवीन ideas मिळाल्या. या संपूर्ण प्रवासात 'काहीही लागल तरी कधीही फ़ोन कर' किवा 'गरज लागल्यास कशीही मदत उपलब्ध होईल' हे सुनील काकांचे शब्द माझ्यासाठी एनर्जी बूस्टर म्हणून काम करत  राहिले.

स्त्रोत : सायली वाळके, walkesayli1986@gmail.com

No comments:

Post a comment