'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

श्रीशैल बिराजदार International Leprosy Union मध्ये कार्यरत

श्रीशैल बिराजदारने (निर्माण १) graduation नंतर एम.एस.डब्ल्यू. केले असून सध्या तो International Leprosy Union मध्ये प्रोग्राम ऑफिसर म्हणून रुजू झाला आहे. यापूर्वी श्रीशैल स्वयंप्रेरणेने पुण्यातील कर्वेनगर येथे कचरा वेचकांच्या मुलांसाठी १.५ वर्ष शाळा चालवत होता. मात्र कचरा वेचकांचे हळूहळू स्थानांतरण झाल्यामुळे त्याला शाळा बंद करावी लागली.
            International Leprosy Union ही एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था असून कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे तसेच कुष्ठरोगाबद्दल जनजागृती करणे असे त्यांच्या कामाचे मुख्य भाग आहेत. संस्थेचे काम भारतभरात ८ राज्यांमध्ये चालत असून, त्यात महाराष्ट्राचा देखील समावेश आहे. संस्थेच्या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात ३ -४ ठिकाणी कुष्ठरोग्यांच्या मुलांसाठी बालवाडी सुरु करणे; कुष्ठरोग्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करण्यासाठी टेलरिंग, मेणबत्त्या बनवणे, कागदी पिशव्या बनवणे इत्यादींचे प्रशिक्षण देणे; गाई-म्हशी देऊन त्यापासून उत्पन्न मिळविण्यास मदत करणे; सरकारी उद्यानांमध्ये बागकामाची नोकरी मिळवून देणे इत्यादी प्रकल्प सुरु आहेत. तसेच देशातील विविध भागांमधील Human Rights Commission, state leprosy officers ह्यांच्याशी संवाद साधून सरकारचे कुष्ठरोग्यांसंबंधीच्या सवलती, नियम, सोयी इत्यादींबद्दल जनजागृती करणे हेदेखील संस्थेचे मोठे काम आहे. प्रोग्राम ऑफिसर म्हणून श्रीशैलवर प्रपोजल बनविण्यापासून ते राबाविण्यापर्यंतची सर्व जबाबदारी आहे. श्रेशैलला त्याच्या कामासाठी शुभेच्छा !
International Leprosy Union बद्दल अधिक माहितीसाठी - http://ilu.org.in/

स्रोत – श्रीशैल बिराजदार, birajdarshree@gmail.com

1 comment:

  1. मी अहमदनगर मधील राहूरी तालुक्यामधे राहत आहे या भागात काही काम करायचे असल्यास सांगा मी काम करील. माझे एम एस डब्लू झाले आहे आणी माझी एक सामाजिक संस्था ही आहे माझा संपर्क नंबर ९८९०२५३३३५ आहे

    ReplyDelete