'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Friday, 28 February 2014

अमृता प्रधानचे SANDRP सोबत काम सुरू

धरणाच्या पर्यायालाच विविध अंगांनी प्रश्न विचारण्याची जबाबदारी
धरण म्हटले की त्याला जोडून अनेक समस्या आपसूकच येतात. या समस्यांचं निराकरण व धरण या पर्यायालाच प्रश्न विचारण्याच्या हेतूने SANDRP (South Asia Network on Dams, Rivers and People) ही संस्था काम करत आहे. गेले वर्षभर ‘प्रयास’सोबत पाणीप्रश्नावरच काम करणाऱ्या अमृता प्रधानने (निर्माण २) SANDRP सोबत काम सुरू केले आहे.
धरण बांधण्यापूर्वी तज्ञांकडून धरणाच्या व्यावहार्यतेबद्दल जे अहवाल बनवले जातात, त्यांचा बारकाईने अभ्यास करणे; धरणाला पर्यावरण मंत्रालयाची अनुमती मिळण्यापूर्वी जी कायदेशीर प्रक्रिया करणे आवश्यक असते ती कितपत काटेकोरपणे करण्यात आली आहे याचा बारकाईने अभ्यास करणे; धरणग्रस्तांच्या विस्थापन प्रक्रियेचा बारकाईने अभ्यास करणे ही SANDRP च्या कामाची पद्धत आहे. सध्या अमृता ठाणे-नाशिक-रायगड जिल्ह्यांतील पश्चिम घाटा अंतर्गत मान्यता मिळालेल्या ८-९ धरणांचा अभ्यास करत आहे.
यापूर्वी ‘प्रयास’सोबत अमृताने काही शहरांच्या पाणीपुरवठ्याचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाची व्यावहार्यता तपासण्याचे काम केले होते. हे काम करत असताना SANDRP चे काही अहवाल तिच्या वाचनात आले. ‘प्रयास’मधील काम संपल्यानंतर तिला पाणीप्रश्नावरच काम करायची इच्छा होती. त्याच वेळी तिला SANDRP सोबत काम करण्याची संधी मिळाली. अमृताला तिच्या प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!
SANDRP बद्दल अधिक माहितीसाठी: http://sandrp.in/

स्त्रोत: अमृता प्रधान, amrutapradhan@gmail.com

No comments:

Post a Comment