'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 30 April 2014

निर्माण ६ येत आहे !
निर्माणची पाचव्या बॅचचे शेवटचे शिबीर फेब्रुवारी २०१४ मध्ये पार पडले. निर्माण ६ ची शिबीरे जानेवारी २०१५ मध्ये सुरू होत आहेत. या बॅचसाठी नवा application form निर्माणच्या वेबसाईटवर ( http://nirman.mkcl.org/ )  
येथे उपलब्ध असून तो भरण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट, २०१४ आहे. अर्जांची छानणी व मुलाखती अशा प्रक्रियांनंतर निवड झालेल्या तरुण-तरुणींची यादी २ ऑक्टोबर, २०१४ रोजी जाहीर होईल.
निर्माण ६ साठी कॉलेजेसमधील प्रसिद्धी व निवडप्रक्रिया जूनमध्ये सुरू होत असून यासाठी तुमची मदत लागणार आहे. त्यापूर्वीदेखील आपल्या मित्र-मैत्रिणींना तुम्ही निर्माणचा नवा application form भरण्यासाठी देऊ शकता.

यावेळी कॉलेजेसमधील प्रसिद्धीसाठी अमृता ढगे व सायली वाळके (दोघी निर्माण ५) या पोस्टर्स डिझाईन  करत आहेत.  ते पूर्ण झाले की सर्वांना पाठवूच.. 


No comments:

Post a comment