'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 30 April 2014

ताज्या घडामोडी

गडचिरोलीच्या ग्रामीण व आदिवासी भागांत सेवा देणाऱ्या सर्जन्सची संख्या खूप कमी आहे. यावर उपाय म्हणून सर्चने शस्त्रक्रिया शिबिरांचे मॉडेल बनवले आहे. या मॉडेल अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्चचे हितचिंतक असणारे उत्तम सर्जन्स वर्षातून एकदा किंवा दोनदा सर्च दवाखान्यात शस्त्रक्रिया करतात. साधारणपणे १५ शस्त्रक्रिया शिबिरांमधून सर्चमध्ये दरवर्षी साधारणपणे ४५० रुग्णांवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात. शस्त्रक्रिया करणारे सर्जन्स स्वतःची फी आकारत नसल्यामुळे इतर ठिकाणच्या तुलनेत सर्चमध्ये रुग्णांना खूप कमी खर्च येतो. सर्जन्स व भूलतज्ञ यांची टीम शस्त्रक्रिया करत असली तरी एका शिबिरातील शस्त्रक्रियांची संख्या बघता शस्त्रक्रियांपूर्वी, शस्त्रक्रियांदरम्यान व शस्त्रक्रियांनंतरही खूप मदतीची आवश्यकता भासते. ही पोकळी प्रत्येक वेळी निर्माणचे डॉक्टर्स भरून काढत असतात. २०१३-१४ वर्षात निर्माणच्या श्रेया गायकवाड, श्रीराम वानखेडे, मृण्मयी मोरे, मुग्धा तोडकर, सुजाता पाटील, पल्लवी बापट, समीक्षा मुरकुटे, श्रेयस गोडबोले, अरुण घुले, पांडुरंग मगर, भूषण देव, विठ्ठल साळवे, अनिकेत पवार, सुरज म्हस्के, गजानन फुटके इ. निर्माणच्या डॉक्टरांची शस्त्रक्रिया शिबिरांत खूप मदत झाली. या डॉक्टरांचे योगदान ही शिबीरे पार पाडण्यात खूप महत्त्वाचे असल्याचे सर्चचे डॉ. योगेश कालकोंडे यांनी सांगितले. ज्या रुग्णांना खूप गरज आहे त्यांची सेवा करण्याची ही संधी असून त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या उत्तम सर्जन्सकडून शिकण्याची संधीही मिळत असल्याचे ते म्हणाले. निर्माणच्या डॉक्टरांनी यापुढेही शस्त्रक्रिया शिबिरांना येत रहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बरेचदा निर्माणचे डॉक्टर आपल्या इतर मित्र-मैत्रिणींनाही शिबिरांना घेऊन येतात. त्यामुळे त्यांचं व निर्माणचं नातं सुरू होतं. त्यांच्यातले काही जण फॉर्म भरून निर्माण शिबिरांतदेखील सहभागी होतात.
तरी निर्माणच्या ज्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया शिबिरांत आपले योगदान देऊन त्याद्वारे शिकण्याची इच्छा असेल, त्यांनी simollanghan@gmail.com वर संपर्क साधावा.
स्त्रोत- अमृत बंग,  amrutabang@gmail.com

खेड्यांकडे चला बीड मध्ये निर्माण चमूचे उन्हाळी शिबीर

महाराष्ट्र नॉलेज फौंडेशन तर्फे चालवण्यात येणाऱ्या SPARK या उपर्क्रमांतर्गत पहिली People Connect Activity (PCA) मोहा, जिल्हा बीड येथे १२ व १३ एप्रिल २०१४ रोजी पार पडली. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबीरआणि जेष्ठ नागरिकांसाठी रक्तदाब तपासणी शिबीरआयोजित करण्यात आले होते. उन्हाळी शिबिरामध्ये कागदी टोप्या बनवणे, विज्ञान खेळणी, संभाषण कौशल्य, चित्रकला, भाषण स्पर्धा, बाल चित्रपट, निबंध स्पर्धा, करियर मार्गदर्शन, असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या शिबिरामध्ये ४०० मुलांनी सहभाग नोंदवला. रक्तदाब तपासणी शिबिरामध्ये लोकांना रक्तदाबाविषयी माहिती देण्यात आली आणि गावातील काही महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिरामध्ये २०० लोकांची रक्तदाब तपासणी करण्यात आली.

शिक्षण, आरोग्य, कला, संस्कृती, ई. क्षेत्रात कौशल्य असलेल्या निर्माणींच्या सहाय्याने या गावामध्ये संबंधित विविध उपक्रम आयोजित करून त्या त्या क्षेत्रातील विकेंद्रित स्थानिक नेतृत्व विकसित करणे हे PCA चा उद्देष्य आहे.
तिथं राहणाऱ्या पोरांची आर्थिक परिस्थिती, राहण्याची-खाण्याची अवस्था बरीच वाईट होती, पण त्यांची गाणी जरा जास्तच वैचारिक होती. Maslow च्या लॅडरमध्ये उड्या मारण्याची पण सोय असेल बहुतेक. गावामध्ये जलसंधारणाच आणि इतर काम करणारे काही कार्यकर्ते होते. त्यांची प्रामाणिक धडपड बघून वाटल की हेच खरं दर्जेदार काम करतायत. पुण्यात शंभर ठिकाणी दिसणाऱ्या भुरट्या आणि भामट्या खटपटी इथं लांब लांब पर्यंत दिसत नव्हत्या. खेड्याकडे चलाम्हणायला अशी अनेक इमोशनल कारण सापडत होती; काही आर्थिक कारण सापडली असती तर बर झालं असत. ती आर्थिक कारण अपोआप निर्माण झाली तर किती छान !

सहभाग
अंबेजोगाई मधून ऋतुजा, प्रतिक, सोहम, स्वप्नील
निर्माण गॅंग - श्रुती आफळे, निकिता येडगे, प्रगती मुरकुटे, शलाका पवार, सायली तामणे, धनंजय मारोडे, भागवत रेजीवाड, प्रफुल्ल वडमारे, आणि निरंजन तोरडमल
स्रोत: निरंजन तोरडमल, niranjan.toradmal1@gmail.com

सह-सचिव पदी अव्दैत दंडवतेची निवड


भारत आणि पाकिस्तानमधील सामान्य जनतेच्या मनातले एकमेकांबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यासाठी, तसेच दोन्ही देशांमधील शांतता आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी दोन्ही देशातील विचारवंत, मानवी हक्क कार्यकर्ते, लेखक, कलाकार यांनी एकत्र येऊन पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस & डेमोक्रसीची १९९३ साली स्थापना केली.
दोन्ही देशातील नागरिकांच्या मनात असलेले एकमेकांचे गैरसमज दूर करायचे असतील तर त्यांनी एकमेकांना भेटावं या उद्देशाने फोरमने Joint-Conventions घेण्यास सुरुवात केली. हे Convention एक वर्ष भारतात, तर एक वर्ष पाकिस्तानात भरवण्यात यावे असे ठरवण्यात आले. गेल्या २० वर्षात एकूण ८ Joint-Conventions घेण्यात आली.
आज दोन्ही देशातील मच्छीमारांच्या अटकेचा प्रश्न, काश्मीर प्रश्न तसेच देशाच्या सरहद्दीवर राहणाऱ्या लोकांच्या प्रश्नावर फोरमने अत्यंत महत्वाचे काम केले आहे आणि यामुळे भारत-पाकिस्तान या दोन्ही देशातील चर्चेमध्ये फोरम एक महत्वाचा दुवा ठरत आहेत.
फोरमच्या कामाचा उल्लेख आनंद पटवर्धन यांच्या War & Peace या documentary मध्ये देखील करण्यात आला आहे जे फोरमच्या Joint-Conventions च्या निमित्ताने पाकिस्तानात  गेले होते.
मार्च महिन्यात पुणे येथे झालेल्या फोरमच्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनात अद्वैत दंडवतेची (निर्माण ४) महाराष्ट्राच्या सह-सचिवपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्रात फोरमच्या कामाचा विस्तार करणे तसेच शांततेचा आणि लोकशाही सुदृढीकरणाचा संदेश महाराष्ट्रात पसरवणे असे काम अद्वैतकडे आहे.
या फोरमच्या सध्या महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव या शहरात शाखा आहेत. तर महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त दिल्ली, गुजरात, पंजाब, काश्मीर यांसह इतर राज्यांमध्ये देखील शाखा आहेत.
या अधिवेशनात निर्माण ५ च्या सागर पाटील, जळगाव याच्याकडे फोरमचे फेसबुक आणि सोशल मिडिया सांभाळण्याची जवाबदारी देण्यात आली.

स्त्रोत: अद्वैत दंडवते,  adwaitdandwate@gmail.com

No comments:

Post a comment