'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Wednesday, 30 April 2014

विशेष

अन्न स्वायत्तता
La  Via  Campesina ही जगभरातील लहान मध्यम शेतकरी चळवळींना जोडणारे जागतिक आंदोलन आहे. शाश्वत शेती स्वावलंबन याचा पुरस्कार करणा-या या चळवळीत प्रथमचअन्न स्वायत्तताया शब्दप्रयोग केला. अन्न स्वायत्ततेची संकल्पना स्पष्ट करणारी ही टिप्पणी. कोरडवाहू गटाने आपल्या सर्वांच्या विचारासाठी पुरवलेले खाद्य...


जगभरातील लहान मध्यम शेतकरी, मच्छीमार, pastoralist आणि ग्रामीण लोक/जनता अन्न स्वायत्ततेच्या मार्गावरील विकासासाठी लढत आहेत. (model of development)
थोडक्यात सांगायचे झाल्यास, ‘अन्न स्वायत्तताम्हणजे प्रत्येक देशाने आपली अन्न शेतीसंबंधीची धोरणे स्थानिक शेतकऱ्यांना, संस्कृतीला आणि पर्यावरणाला संपूर्ण प्राधान्य देऊन आखण्याचे स्वातंत्र्य. याचाच अर्थ असा की देशी-विदेशी कंपन्यांच्या आधी स्थानिक शेतकऱ्यांचा बाजारावर आणि अन्न उत्पादनासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर जसे की बी-बियाणे, पाणी, जमीन, योग्य किंमत आणि मिळकत यावर पहिला हक्क असेल. या सर्व संसाधनांचे व्यवथापन नियमन कसे करावे हे ठरवण्याचा तसेच याबाबतचे महत्वाचे निर्णय घेण्याचा हक्क स्थानिक शेतकऱ्यांना असावा. त्यांना जागतिक बाजारपेठेतील किंमती वस्तूंपासून संरक्षण असावे. ग्राहकांना स्थानिक, आरोग्यदायी आणि पोषक असे अन्नधान्य विकत घेण्याची संधी असावी. अशा प्रकारच्या अन्नाचा पुरस्कार केला जावा. आरोग्यास हानिकारक असलेले अन्नपदार्थ विकणाऱ्या त्यासाठी त्यासाठी दुर्मीळ संसाधनांचा वापर करणाऱ्या के. एफ. सी. मॅकडॉनल्ड्स अशासारख्या कंपन्यांचा पुरस्कार केला जाऊ नये.
अन्न स्वायत्तताहा शब्दप्रयोग सर्वप्रथम ला व्हिया कॅम्पेसिना (La Via Campesina) या शेतकऱ्यांच्या जागतिक चळवळीने केला. LVC ची अन्न स्वायत्ततेची तत्वे आता जगभर मान्य झाली आहेत त्याला एक चळवळीचे स्वरूप आले आहे. ही तत्वे पुढील प्रमाणे-

अन्नस्वायत्तता म्हणजे काय?
) अन्न हा मुलभूत मानवी हक्क:
प्रत्येकाला आरोग्याला धोका पोहोचवणारे, पोषक पारंपारिकदृष्ट्या योग्य असे अन्न खायला मिळायलाच हवे. निरामय आरोग्य तसेच आत्मसन्मानासाठी (human dignity) हे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक देशाने अन्न उपलब्धता हा मुलभूत मानवी हक्क म्हणून मान्य करायला हवा आणि त्यासाठी शेती या प्राथमिक क्षेत्राचा योग्य तो विकास करायची हमी द्यायला हवी. तरच या मनवी हक्काची पूर्तता होईल.

) शेतकी सुधारणा (Agrarian Reform):
भूमीहीन भूमीधारक शेतकरी, विशेषतः स्त्रियांना ते कसत असलेल्या जमिनीची तसेच आदिवासी (indigenous) लोकांना ते राहत असलेल्या प्रदेशाची मालकी ताबा मिळवून देण्यासाठी काही मूलभूत शेतकी सुधारणांची किंवा फेरबदलांची नितांत गरज आहे. जमिनीच्या हक्कामधे धर्म, जात, लिंग, विचारधारा . कोणत्याही गोष्टींवरून दुजाभाव केला जाऊ नये. कसेल त्याचीच जमीन असायला हवी.

) नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण:
अन्न स्वायत्तताया संकल्पनेत नैसर्गिक संसाधनांचा खासकरून जमीन, पाणी, बी-बियाणे आणि शुधन यांचा सुयोग्य विवेकाने वापर या सर्व बाबी ओघाने आल्याच. या संसाधनांवर कोणीही व्यक्ती वा कंपनी बौद्धिक मालमत्ताम्हणून मालकी हक्क सांगू शकत नाही. जमीन कसणाऱ्यांना नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन करायचा अधिकार आहे हे केवळ उपजीविकेची कायमस्वरूपी हमी देणारी सक्षम अर्थव्यवस्था, सुपीक जमीन शेतकी रसायनांचा कमीतकमी वापर याद्वारेच शक्य होईल.

) अन्नधान्य खाद्यपदार्थ व्यापारात फेरबदल:
अन्नाची मुख्य गरज पोषणासाठी आहे. अन्नचा व्यापार ही दुय्यम गोष्ट आहे. राष्ट्रीय कृषी धोरणात अन्नधान्याचा देशांतर्गत वापर आणि अन्न स्वयंपूर्णता (food self sufficiency) याला सर्वात जास्त महत्व देण्यात यावे. अन्नधान्याच्या आयातीचा स्थानिक अन्नोत्पादनावर किंवा शेतमालाच्या किंमतींवर विपरीत परिणाम व्हायला नको.

) उपासमारीच्या जागतिकीकरणाला आळा:
बहुद्देशीय/ बहुराष्ट्रीय संस्था आणि अन्नधान्य व्यापारात केलेली गुंतवणूक यामुळे अन्न स्वायत्तता धोक्यात येते. जागतिक व्यापारी संस्था (World Trade Organization), जागतिक बॅंक यासारख्या बहुराष्ट्रीय संस्थांच्या पाठिंब्याने बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कृषी धोरणांवर नियंत्रण वाढत चालले आहे. म्हणूनच अशा कंपन्यांच्या कर व्यवस्थेवर तसेच आचारसंहितेवर कठोर नियंत्रण ठेवायची गरज आहे.

) सामाजिक शांतता:
प्रत्येकाला हिंसेपासून मुक्त असण्याचा हक्क आहे. अन्नाचा अस्त्रासारखा वापर केला जाऊ नये. खेड्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष, तेथील वाढती गरिबी तसेच अल्पसंख्याक आदिवासी समाजांचे वाढते शोषण यामुळे अन्याय आणि निराशेची परिस्थिती तयार होते. छोट्या शेतक-यांचे विस्थापन, त्यांच्यावर लादले गेलेले शहरीकरण, दडपशाहीचा कारभार तसेच त्यांना दिली जाणारी कमीपणाची वागणूक सहन केली जाणार नाही.

) लोकशाहीचे नियंत्रण:
सर्व पातळ्यांवरची कृषी विषयक धोरणे ठरवण्यामधे शेतक-यांचा थेट सहभाग असायला हवा. यासाठी आधी संयुक्त राष्ट्र संघ इतर संलग्न संस्थांमधे लोकशाही आणणे आवश्यक आहे. खरी, अचूक माहिती आणि लोकशाहीतत्वावर आधारित खुली निर्णय प्रक्रिया हा सर्वांचा अधिकार आहे. हे अधिकार चांगला राज्यकारभार, जाबदायित्व आणि कोणत्याही भेदभावापासून मुक्त असलेल्या आर्थिक-राजकीय-सामाजिक जीवनाचा पाया आहे. विशेषतः ग्रामीण स्त्रियांना अन्नविषयक इतर ग्रामीण समस्यांसंदर्भातील निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे.  
- By La  Via  Campesina
(अनुवाद – कोरडवाहू गट)


वैज्ञानिक जीवनशैलीचा जीवन उत्सव
यंदा फेब्रुवारी महिन्यात सीमोल्लंघनमध्ये नाशिकच्या जीवन उत्सवाविषयी बातमी लिहिली. त्याचवेळी जाणवलं की या कार्यक्रमाविषयी सविस्तर लिहिण्याइतकी वर्षे आता जीवन उत्सवाला झाली आहेत. आणि याविषयीचे अनुभव आपल्या मित्र-मैत्रिणींशी शेअर करण्यासाठी ‘सीमो’ ही अगदी हक्काची जागा आहे! असं वाटलं आणि अगदी त्याचवेळी संपादकांनी ‘यावर एक प्रदीर्घ (!) लेख लिहिशील का?’ अशी विचारणा केली, म्हणून या लेखाचा प्रयत्न करतेय.जीवन उत्सव विषयी वाचूया जीवन उत्सवच्या वाटचालीची पहिल्यापासून साक्षीदार राहिलेल्या मुक्ता नावरेकर कडून...  
२००८ च्या ऑक्टोबर महिन्यात नाशिकच्या काही सर्वोदयी मंडळींनी खादी आणि पुस्तकांचे एक प्रदर्शन भरवलं. दसऱ्याच्या आसपास भरवलेल्या या प्रदर्शन आणि विक्रीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. इतका की दुसऱ्या दिवशीच बऱ्यापैकी खादी संपली आणि पुन्हा नवी खादी तातडीने मागवावी लागली. यासोबतच अजून एक गोष्ट लोकांच्या प्रतिक्रियांवरून जाणवली, फक्त प्रदर्शन आणि विक्री या गोष्टी पुरेशा नाहीत, तर लोकांची एक वैचारिक भूक आहे आहे. आणि कोणत्या तरी प्रभावी माध्यमातून जीवनशैलीचे हे विचारही आपण पोहोचवायला हवेत. पण साधारणपणे असे वैचारिक कार्यक्रम फारच रूक्ष, बोजड असे असतात असा एक समज. (काही अंशी तो खराही आहे!) त्यामुळे पहिल्यापासूनच आपला कार्यक्रम असा एकसुरी होऊ नये असा आमचा सर्वांचा आग्रह होता. सध्या सगळीकडे विविध festivals होत असतात. Food festival, shopping festival … असाच जीवनशैली शिकवणारा, अनुभवून देणारा उत्सव असावा. आणि जीवनशैलीचे, पर्यावरणाचे हे विचार उत्सवी आणि उत्साही वातावरणात लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून या कार्यक्रमाला नाव दिलं ‘जीवन उत्सव’.

जीवन उत्सव कशासाठी?
हा मुख्यतः वैज्ञानिक जीवनशैलीवर आधारित कार्यक्रम आहे. सध्याच्या सर्वच समस्यांचे – गरीबीपासून पर्यावरणाच्या ऱ्हासापर्यंत आणि बेरोजगारीपासून आरोग्याच्या वाढत्या तक्रारींपर्यंत – मूळ हे आपल्या अयोग्य जीवनशैलीत आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवनात प्रश्न निर्माण होत आहेत. यावर उत्तर म्हणजे वैज्ञानिक जीवनशैली. अर्थात वैज्ञानिक जीवनशैली म्हणजे आधुनिक जीवनशैली इतका मर्यादित हा विचार नाही. आपल्या दैनंदिन जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला विज्ञानाची जोड देणे येथे अपेक्षित आहे. उदा. कचरा फक्त घंटागाडीने गोळा करून गावाबाहेर नेणं अवैज्ञानिक, तर त्याचं शास्त्रीय आणि विकेंद्रित पद्धतीने व्यवस्थापन करणं वैज्ञानिक. फास्टफूड, जंकफूड अतिप्रमाणात खाणं, सिंथेटिक कपडे वापरणं, पाण्याचा बेसुमार वापर करणं अवैज्ञानिक; तर शास्त्रीय पद्धतीने शिजलेलं, सेंद्रीय अन्न खाणं, खादीचे किंवा सुती कपडे वापरणं, पाण्याचा सुयोग्य वापर करणं म्हणजे वैज्ञानिक जीवनशैली. हे सूत्र मिळाल्यानंतर जीवन उत्सवाच्या आयोजनात खूपच मजा येऊ लागली.

कार्यक्रमाचे विषय:
            जीवन उत्सव मध्ये जीवनशैलीशी संबंधित अनेक विषय घेतले गेले. यात पहिल्या वर्षी अन्न, वस्त्र, पाणी, उर्जा आणि कचरा; दुसऱ्या वर्षी शिक्षण, मनोरंजन व माध्यमे, आरोग्य; तिसऱ्या वर्षी शेती, करीअर (जीवनध्येय); चौथ्या वर्षी बदलते अर्थकारण आणि चंगळवाद; पाचव्या वर्षी नद्यांचे भवितव्य, नाशिकचा पर्यावरणीय आणि वैज्ञानिक विकास इ. विषय होते. ‘रंग बरसे’ ही घरच्या घरी नैसर्गिक रंग बनवण्याची कार्यशाळाही चौथ्या वर्षी घेण्यात आली. या सर्व विषयांचा आम्ही सर्वजण आधी गटागटाने अभ्यास करतो. ३० जानेवारीला सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाच्या नियोजनाची सुरुवात जूनमध्येच होते. विविध विषयांपासून सादरीकरणाच्या विविध पद्धतींचा अभ्यास, त्या त्या विषयातील तज्ञांना आमंत्रित करणे, निधी संकलन, कार्यक्रमाचा प्रचार ही सर्वच कामे जून ते जानेवारीदरम्यान केली जातात.
कचरा गोळा करून गावाबाहेर नेणं अवैज्ञानिक, तर त्याचं शास्त्रीय आणि विकेंद्रित पद्धतीने व्यवस्थापन करणं वैज्ञानिक. 
जीवनाच्या प्रत्येक पैलूत वैज्ञानिक विचार जीवन उत्सव मांडत असतो.
          जीवनशैलीचे हे विषय आम्ही खूप विविध पद्धतींनी वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीने मांडतो. व्याख्यान, परिसंवाद, मुलाखती हे तर असतंच, पण प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या कार्यशाळा, विविध फिल्म्स, माध्यम जत्रा, करिअर जत्रा (अर्थात पर्यावरणीय आणि वैज्ञानिक करिअर), पोस्टर प्रदर्शनी, शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा अशा अनेक प्रकारांचा समावेश जीवन उत्सवात करण्यात येतो. या सर्व विषयांची मांडणी अतिशय रंजक परंतु तेवढीच मनावर ठसा उमटवणारी असावी असा आमचा प्रयत्न असतो.
‘अवघड आहे पण अशक्य नाही !’
            जीवन उत्सव हा मुख्यतः कृती केंद्रित आहे. म्हणजे फक्त वैचारिक मांडणी करून न थांबता आचरणात आणता येतील असे काही पर्यायही आम्ही सुचवतो. उदा. प्लास्टिक आणि थर्माकॉलला पर्याय, पाणी बचतीचे सोपे मार्ग इ. पहिल्या वर्षीच्या विषयांवर एक सुंदर पोस्टर प्रदर्शनी बनवली होती. नंतर दरवर्षी विषयांनुसार या पोस्टर्समध्ये वाढ होत गेली. कमी शब्दांत योग्य आशय पोहोचवणारी ही बोलकी पोस्टर्स सर्वांना आवडतात. मग या पोस्टर्सवर आधारित प्रत्यक्ष कृती करायला मदत करणारं ‘अवघड आहे, पण अशक्य नाही’ हे पुस्तक जीवन उत्सवने प्रकाशित केले. हे पुस्तक वाचकांना खूप आवडतं.
‘Let’s Be The Change…’
            ‘स्वतःला बदलवा, जग बदलेल’ ही जणू जीवन उत्सवची tag line च बनलीय. गांधीजींचं हे वाक्य अतिशय अर्थपूर्ण तर आहेच, पण बदलासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठं नैतिक बळ देणारा हा विचार आहे. आणि जीवन उत्सवमध्ये तो जास्तीत जास्त पाळण्याचा सगळेच मनापासून प्रयत्न करतात. वैयक्तिक जीवनशैलीत बदल हा तर मोठा भाग आहेच, पण जीवनउत्सवच्या सर्व कार्यक्रमांमध्येही याचा काटेकोरपणे विचार केला जातो. आतापर्यंत कधीही फ्लेक्सचा वापर केला गेला नाही. कापडी आणि कागदी banners वापरतो (फ्लेक्समध्ये ५०-६०% प्लास्टिक असते.). स्टेजवर सजावटीसाठी थर्माकॉल, प्लास्टिक न वापरता कागद, पानं-फुलं, खादीचं कापड इ. वापर करतो. येणाऱ्या व्याख्यात्यांना पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तू न देता खादीचं कापड, सेंद्रीय गूळ, चरबीविरहित साबण, फळांची टोपली, खादीचा हातरुमाल अशी भेट देतो. प्लास्टिक किंवा कागदाचे मग, थर्माकॉलच्या पत्रावळी, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या या गोष्टी जीवन उत्सवमध्ये चुकुनही वापरल्या जात नाहीत. प्रदर्शनातील सर्व पोस्टर्सही कागदी व हाताने बनवलेले आहेत. जीवन उत्सवचं उद्घाटन कधीही फीत कापून होत नाही, तर प्रमुख पाहुणे चरख्यावर सूतकताई करून उद्घाटन करतात.
            जीवन उत्सव सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून अनेक माध्यमांचा वापर केला गेला. प्रत्येक वर्षी नवं माध्यम, नवी पद्धत... यात अनेक प्रयोग करता आले. त्यातले काही –
चौकसभा
            एके वर्षी आम्ही कार्यक्रमाच्या १५-२० दिवस आधीपासून नाशिकमध्ये अनेक ठिकाणी चौकसभा घेतल्या. नाव जरी चौकसभा होतं, तरी त्यांचं स्वरूप कोणत्याही प्रचार सभेपेक्षा खूपच वेगळं होतं. चौकात मोक्याच्या ठिकाणी आम्ही खादी आणि पर्यावरणीय वस्तूंचा स्टॉल लावायचो. सोबत जीवन उत्सवची banners, माहितीपत्रकं आणि काही पुस्तकंही असायची. कधीकधी माईकवरून माहितीही द्यायचो.
फिल्म
            तिसऱ्या वर्षी आम्ही जीवन उत्सवची एक डॉक्युमेंटरी बनवली. आधीच्या जीवन उत्सवचं थोडं शूटिंग आणि जीवन उत्सव म्हणजे काय? कशासाठी? इ. माहिती सांगणारी ही फिल्म आम्ही शाळा महाविद्यालयांमध्ये दाखवली. डॉक्युमेंटरी हे अतिशय प्रभावी माध्यम आहे याची प्रचीती आली.
            २०१४मध्ये म्हणजेच सहाव्या वर्षी आम्ही जीवन उत्सवाच्या स्वरूपात बरेच बदल केले. २-३ दिवसांच्या, एकाच जागी होणाऱ्या कार्यक्रमांऐवजी ७ दिवसांचा जीवनशैली सप्ताह आयोजित केला. या आयोजनात नाशिकमधील ५० हून अधिक संस्था, शाळा महाविद्यालये आणि काही इंडस्ट्रीज सहभागी झाल्या. प्रत्येक ठिकाणी ७ दिवस जीवन उत्सवच्या विविध विषयांवर कार्यशाळा, व्याख्यानं, स्पर्धा, प्रदर्शनी असे भरपूर कार्यक्रम झाले. सोबतच जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल केलेल्या काही विशेष व्यक्ती, जोडपी, तरुण मंडळी यांच्या मुलाखतीही नाशिकमध्ये ठिकठिकाणी झाल्या. या मुलाखतींच्या आयोजनात प्रामुख्याने दिलीप व पूर्णिमा कुलकर्णी यांचा सहभाग होता. या संपूर्ण सप्ताहाला नाशिककरांचा खूपच छान प्रतिसाद मिळाला. त्यातले अनुभवही सांगण्यासारखे आहेत. त्याविषयी नंतर कधीतरी...
दोस्त मिलते गये और कारवॉं बनता गया...
            जागतिकीकरण, प्रचंड वेगाने होणारा भौतिक विकास, पर्यावरणाचे वाढते असंतुलन इ. च्या या भल्यामोठ्या प्रवाहात आपल्या एव्हढ्याशा प्रयत्नांनी काय होणार? खरंतर याचं ठोस उत्तर आम्हा कोणाकडेच नसावं... पण... म्हणून जे होतंय ते फक्त पाहत रहायचं का? नक्कीच नाही. म्हणूनच हा लहानसा प्रयत्न. या प्रयत्नांना अनेकांचा पाठींबा, शाबासकी मिळाली. म्हणूनच तो non stop ६ वर्षे चालला. लवकरच २०१५ची तयारी सुरू होईल. डॉ. अभय बंग, डॉ. अनिल अवचट, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजीव शारंगपाणी, डॉ. राणी बंग या सर्व उद्घाटकांचे आणि अनेक व्याख्याते, मित्रमंडळींचे प्रोत्साहनही यास कारणीभूत आहे.
            नाशिकमध्ये होणारा हा उपक्रम पाहून पुण्यात आणि मालेगावमध्येही असे अनेक कार्यक्रम झाले, होत आहेत. जळगावमध्येही जीवन उत्सवचे आयोजन सुरू आहे. नाशिकचा जीवन उत्सव पूर्णपणे लोकसहभागातून होतो. यात कधीच कोणाची sponsorship, partnership घेतली जात नाही. तरीही लोकांकडून निधी गोळा होतो आणि कार्यक्रम पार पडतो. लोकांच्या प्रतिसादाविषयी नेहमीच शंका असते. कधी रिकाम्या खुर्च्या पहाव्या लागतात, तर कधी सभागृहाबाहेर स्क्रीनची व्यवस्था करावी लागते.
जीवन उत्सवचा उद्घाटनाचा कार्यक्रम, स्टेजची सजावट यांच्यामागे खूप काटेकोरपणे विचार केला जातो.

             असा हा काहीसा वेडा प्रयत्न. निर्मलग्राम निर्माण केंद्र
, मराठी विज्ञान परिषद (नाशिक विभाग), लोकाधार, सर्वोदयी मित्र परिवार (नाशिक) आणि अभिव्यक्ती- media for development यांनी २००८ पासून घेतलेला वैज्ञानिक जीवनशैलीचा ध्यास किंवा वेड सगळ्यांनाच लागावे अशी आमची इच्छा आहे. आणि अशी वेडी स्वप्नं पाहणाऱ्या सर्वांचं जीवन उत्सवच्या परिवारात नेहमीच स्वागत आहे.
मुक्ता नावरेकर, muktasn1@gmail.com

No comments:

Post a comment