'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 1 July 2014

आसामी, असा मी

ज्ञान प्रबोधिनीच्या ‘ग्यान सेतू’ या कार्यक्रमांतर्गत आसाम या भारताच्या उत्तर पूर्वेकडील राज्याच्या अतिदुर्गम भागांतील शाळांमध्ये जाऊन विज्ञानाचे प्रयोग, व प्रात्याक्षिके करण्याची संधी प्रदीप देवकातेला (निर्माण ४) मिळाली. या अनुभवाबद्दल त्याच्या शब्दात..


“२० मार्च ते ३ एप्रिल २०१४ या सुमारे १३ दिवसांच्या काळात मी आणि काही रिटायर्ड काका, काकू अशा ५ जणांच्या चमूला आसाम मधील कार्बी, अंग्लोंग या आदिवासी जिल्ह्याच्या तुमप्रेंग या गावातील शाळांमध्ये वैज्ञानिक प्रयोग करण्याची संधी मिळाली. तुमप्रेंग पासून ६० किलोमीटरवर डोंगरमाथ्यावर वसलेल्या ‘जिरकिडिंग’ गावातील ‘जिरकिडिंग इंग्लिश मिडीयम स्कूल’ या शाळेत आम्ही प्रयोगांना सुरवात केली. शाळेत पायाभूत सुविधांचाही अभाव जाणवला. पण इथले शिक्षक ज्ञानदानाचं कर्तव्य अखंडपणे बजावत आहेत. इथल्या आठवी व नववीच्या वर्गांसाठी आम्ही प्रयोगांना सुरवात केली. वैद्य काकांच्या बेधडक स्वभावामुळे आणि त्यांच्या मुलांशी गट्टी करण्याच्या कसबामुळे कार्यक्रम अगदी छान पार पडला.
दुसरया दिवशी सकाळी एका नवीन शाळेत ज्ञानसेतूचे प्रयोग केले तर दुपारी जिरकिडिंग मधील प्राथमिक शाळेत प्रयोग केले. इथली मुले फक्त आसामी भाषा जाणत होती. पण शाळेतील सहदेव महान्तो या अफलातून मास्तरांनी दुभाषाचे काम अतिशय उत्कृष्टपणे केले; त्यामुळे इथेही प्रयोग यशस्वीरीत्या करता आले. त्या संध्याकाळी बाईकचा परतीचा प्रवास करून आम्ही तुमप्रेंगला आलो.
नंतरचे दोन दिवस तुमप्रेंग मधील शाळांमध्ये वैज्ञानिक प्रयोग केले. दिवसभर शाळांमधून प्रयोग नि रात्री एखादा आदिवासी सांस्कृतिक कार्याक्रम असे दिवसाचे नियोजन अतिशय छान जमले होते. शेवटी विवेकानंद केंद्राच्या शाळेत शिबिराचा समारोप करून आम्ही तुमप्रेंगला अलविदा म्हटले.”

स्रोत: प्रदीप देवकाते, pradip.236@gmail.com

No comments:

Post a Comment