'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 1 July 2014

राजू भडकेचे ‘सेव्ह द चिल्ड्रन, इंडिया’ बरोबर काम सुरु

निर्माणच्या पहिल्या बॅचचा राजू गेल्या काही वर्षांपासून बालशिक्षणात काम करतोय. नुकतेच त्याने ‘सेव्ह द चिल्ड्रन, इंडिया’ या संस्थेबरोबर ‘कंटेंट एक्स्पर्ट’ म्हणून काम करायला सुरवात केली. मुंबईत महानगरपालिकेच्या शाळांसोबत ही संस्था काम करते. शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी उपचारात्मक उपाय करणे, अशा विषयात संस्थेचे काम प्रामुख्याने चालते.
यापूर्वी राजूने गरम मंगल आणि प्रथम या संस्थांबरोबर काम केले आहे.
राजूला या नव्या कामासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
स्रोत: राजू भडके, rbguru11@gmail.com

No comments:

Post a Comment