'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 1 July 2014

शेतकरी चर्चेत का आहेत आणि का असावेत? - रामानुजन महालनोबिस

आजच्या सुधारकया मासिकाच्या मे 2013 च्या अंकातून (आजचा सुधारक / मे 2013 / 6464 / आकडेबाजी 2) घेतलेले खालील सदर शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल थोडक्यात जाणीव करून देते.
एक तरूण उद्योजक-स्नेही सांगत होता, मला बावीस सरकारी खात्यांशी झगडत काम करावं लागतं! नाकी नऊ येतात. पण लोकांना आम्हा तरूण entrepreneurs बद्दल काही सहानुभूतीच नाही. सगळे आपले शेतकरी आणि त्यांच्या आत्महत्यांबद्दल बोलतात! आणि तो त्याच्या बी.एम.डब्ल्यू.मधून निघून गेला.
2007 साली अर्जून सेनगुप्ता आयोगाने अविरचित क्षेत्रातील उपजीविकेची कामे करण्याच्या स्थिती (On Conditions of Work and Promotion of Livelihoods in the Unorganized Sector) यावर एक अहवाल सादर केला. त्यात शेतकऱ्यांशी निगडीत काही आकडेवारी दिली गेली. शेतकरी चर्चेत का आहेत आणि का असावेत ते कळण्यासाठी या आकडेवारीचा उपयोग होईल.


म्हणजे 84% शेतकऱ्यांची शेती थेटपणे आतबट्ट्याची आहे. 10% शेतकरी जेमतेम नाक पाण्यावर ठेवू शकत आहेत. उरलेले 6% यशस्वी आहेत.स्त्रोत: असंघटित क्षेत्रातील कामाची परिस्थिती आणि उपजीविकेचा विकासअर्जुन सेनगुप्ता आयोगाचा २००७ चा अहवाल.
सर्व आकडे कुटुंबांसाठी आहेत, व्यक्तींसाठी नाही.
शेतकऱ्यांची गरज निरपवादपणे सर्व माणसांना आहे. माझ्या तरूण उद्योजक-स्नेह्याशिवाय, त्याच्या त्या बावीस सरकारी खात्यांशिवाय मात्र इतरांचे चालू शकते!
काळजी करण्यासारखी बाब म्हणजे लोक व माध्यमे बोलतात शेतकऱ्यांबद्दल, पण भले करतात उद्योजक व सरकारी खात्यांचेच. बँका व विमा कंपन्यांना उद्योगम्हणतात, हा वेगळाच विनोद!
स्रोत: तन्मय जोशी, tanmay_sj@yahoo.com (कोरडवाहू गटातर्फे)

No comments:

Post a Comment