'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 1 July 2014

श्रद्धा चोरगी ‘प्रथम’सोबत कार्यरत

श्रद्धा चोरगी (निर्माण ४) मार्चपासून ‘प्रथम’सोबत कार्यरत आहे. ‘अक्षर भारती’मध्ये असताना श्रद्धाला भारतातील शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास करण्याची, तसेच शिक्षणव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी स्वयंसेवी क्षेत्राची काय भूमिका असू शकते हे समजून घेण्याची तिची इच्छा होती. ‘प्रथम सायन्स प्रोग्राम’ अंतर्गत तिला ‘असर’ रिपोर्टनुसार शैक्षणिकदृष्ट्या अविकसित भागांतील सरकारी शाळांसोबत काम करण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे तिने प्रथममध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला.
‘प्रथम सायन्स प्रोग्राम’अंतर्गत ५वी ते ८वीच्या मुलांसाठी त्या त्या राज्यांतील अभ्यासक्रमांनुसार शैक्षणिक
साहित्य तयार करण्याचे तिचे काम आहे. शैक्षणिक साहित्य तयार झाल्यानंतर विविध भागांतील मुलांसोबत त्याचा पथदर्शी प्रयोग करणे, प्रथमच्या विज्ञान शिक्षकांना प्रशिक्षण देणे, प्रत्यक्ष ग्रास रूट्सवर तो विषय ठरलेल्या पद्धतीनुसार शिकवला जात आहे का याची पाहणी करून शैक्षणिक साहित्यात आवश्यक त्या सुधारणा सुचविणे ही तिची जबाबदारी आहे.
श्रद्धाला तिच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!
स्त्रोत- श्रद्धा चोरगी, chorgi.shraddha@gmail.com

No comments:

Post a Comment