'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 1 July 2014

मन्याळीत कबड्डीच्या सामन्याचे आयोजन

कबड्डी हा खेळ महाराष्ट्रातील सर्वच भागात अत्यंत आवडीचा असून गावोगावच्या जत्रेत हा खेळ खेळला जातो. डीसेंबर ते मार्च दरम्यान शेतातील कामे साभाळत तरूण या खेळात सहभागी होत असतात.  आमचे मन्याळी गावही याला अपवाद नाही.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील मन्याळी तांडा येथे कबड्डी या पारंपारीक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या खेळासाठी तहसीलदार यांच्याकडून पहिले बक्षीस पंधरा हजार रूपयेतर दुसरे बक्षीस ठाणेदार यांचे कडून दहा हजार रूपये तर तिसरे बक्षीस सात हजार रूपये. व इतर असे एकूण चाळीस हजार रूपयांची जंगी लूट ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत एकेचाळीस संघानी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी तांड्यातील गणेश मंडळाने पार पाडली.
आठरा वर्षापुढील तरूण या खेळात मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. गावा-गावातून किमान दोन तरी संघ स्पर्धेत भाग घेतात. प्रेक्षकाच्या भरभरून प्रतिसादाने मन्याळी तांड्यास स्पर्धांदरम्यान जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
संतोष गवळे, sgawale05@gmail.com

No comments:

Post a Comment