'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Tuesday, 1 July 2014

PCA - एक समृद्ध करणारा अनुभव

महाराष्ट्र नॉलेज फौंडेशन अंतर्गत सोशल ऑलिम्पियाड या कार्यक्रमाद्वारे शालेय मुलांमध्ये कृती कार्यक्रमांच्या माध्यमातून, सामाजिक प्रश्नांप्रती संवेदनशीलता जागवणे, सामुहिक नेतृत्वगूण व सामाजिक बुद्धिमत्ता यांचा विकास कसा करता येईल याचा शोध घेणे या प्रयत्नात मला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत सोशल ऑलिम्पियाडचे प्राथमिक Model उभे करण्यात बऱ्यापैकी यश मिळाले. महाराष्ट्र नॉलेज फौंडेशन अंतर्गतच ‘स्पार्क’(Sustainability Prosperity & Agriculture Revival through Knowledge) हादेखील एक कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाचे स्वरूप अभ्यासताना मला त्यामध्ये काही संधी जाणवल्या व निर्माणच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने त्या दूर करण्याचा एक विकल्प समोर आला. सुरवातीला निर्माणच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाची ओळख करून देणे व त्यांना त्यात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हे मोठे आव्हान वाटत होते मात्र पुण्यातील सर्वच निर्माणींनी याबाबत अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला व पुढील मार्ग सुकर झाला.
मी स्वतः शिक्षण या विषयावर काम करतो, तसेच इतर सहभागी निर्माणी मित्र – कुणाचे शिक्षण चालू आहे तर कुणी खाजगी क्षेत्रात नोकरी करतो आहे, कुणी नवीन क्षितिजांच्या शोधात निघाले आहेत इ. या सर्वांच्या मदतीतून ग्रामविकासाच्या या उपक्रमामध्ये आपण कितपत यशस्वी ठरू हा मोठा प्रश्न होता. परंतु निर्माणमध्ये दिसलेल्या शैक्षणिक दिशेनेच आपण वाटचाल करत असू याची मात्र खात्री होती.
गेली दोन महिने खूप सारे निर्माणी व त्यातून जोडले गेलेले नवीन मित्र (नव-निर्माणी) यांच्या सहाय्याने ‘People Connect Activities’च्या माध्यमातून स्पार्क अंतर्गत समाविष्ट असलेल्या पाच गावांमध्ये आम्ही विविध उपक्रम पार पाडतो आहोत. सेवा, मनोरंजन, आरोग्य, शिक्षण, प्रशिक्षण, शेती व पाणी या विषयांतील अद्ययावत माहिती, ज्ञान व तंत्रज्ञानाचे गावाच्या पातळीवर हस्तांतरण व गावात नवीन तरुण नेतृत्व (राजकीय नव्हे) उभे करणे असे साधारणपणे या उपक्रमांचे स्वरूप आहे. या सर्व प्रक्रियेतून ग्रामविकासाचे एक Model विकसित करता येईल का हे पहाणे हा मुख्य हेतू आहे.
या प्रक्रियेत मागील फक्त दोन महिन्यात ८०० पेक्षा जास्त गरजू लोकांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली, ७०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांपर्यंत उन्हाळी वर्ग व इतर कार्यक्रम पोचवण्यात आले, व सर्वात महत्वाचे म्हणजे एकूण ९५ पेक्षा जास्त निर्माणी, नव-निर्माणी व गावातील स्वयंसेवकांचे नेटवर्क तयार झाले. या नेटवर्क कडून येत असलेला अनुभव, त्यांनी केलेले काम व गावाकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता या उपक्रमावर अधिक लक्ष केंद्रित केल्यास काही अभिनव Models उभी राहू शकतील असा विश्वास वाटतो.
या सर्व कामामध्ये आम्हा सर्व निर्माणींना खूप प्रकारचे बरे-वाईट अनुभव आले, आपल्या निर्माणी मित्रांची नव्याने ओळख झाली, गावपातळीवरील समस्यांची गंभीरता व सत्यता जवळून अनुभवता आली, कामाची आखणी करण्यापासून ते प्रत्यक्ष पार पाडताना आलेले अनुभव, त्यावर अंतर्गत व बाह्य अभिप्राय मिळवून कार्यक्रम अधिकाधीक परिपूर्ण कसे होतील याचा प्रयत्न करताना प्रचंड शिक्षण झाले. बरेच कटू व हृदयद्रावक अनुभव येऊनदेखील, ‘ब्लीडींग हार्ट’ दृष्टीकोन बाजूला सारून वाहवत न जाता योजनाबध्द पद्धतीने आपल्या उद्धीष्टांशी कायम प्रामाणिक राहून काम करताना ‘निर्माण’ मध्ये झालेले शिक्षण व प्रशिक्षण मोलाचे ठरले. खरे पाहिले तर अशा प्रकारचे कार्यक्रम विविध राजकीय झेंड्याखाली सर्रास चालू असतात परंतु त्यामागील आपला दृष्टीकोन व उद्धीष्ट यामध्ये कमालीचा फरक आहे व तेच या कार्यक्रमांच्या आजवरच्या यशाचे गमक म्हणता येईल.
गावपातळीवरील राजकीय हेवेदावे, विविध तुकड्यांमध्ये विभागला गेलेला समाज, विकास कामान्प्रती आलेल्या कटू अनुभवांमुळे उदासीन असलेला तरुण वर्ग, समाजापासून तोडले गेलेल्या शैक्षणिक संस्था ई. यांच्याशी संवाद करून त्यांचे सहकार्य मिळवणे व या विकासकामांच्या जवाबदारीचे हस्तांतरण करणे हे आमच्यापुढील एक मोठे आव्हान आहे. परंतु दिवसेंदिवस जुडत चाललेले गावकरी, निर्माणी, नव-निर्माणी व त्यांचा अनुभव, ज्ञान व उर्जा तसेच महाराष्ट्र नॉलेज फौंडेशन कडून मिळणारे प्रोत्साहन व पाठबळ याच्या जोरावर हे आव्हान पेलण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो आहोत.
एखाद्या विशिष्ठ विषयावर काम करणारे, त्यात कौशल्य असणारे तज्ञ, निर्माणी व इतर तरुण मित्रांनी या उपक्रमांमध्ये जरूर भाग घ्यावा व त्यातून आपला अनुभव व हा कार्यक्रम अधिक समृद्ध करावाअसे मी आवाहन करतो.
स्रोत: प्रफुल्ल शशिकांत, prafulla.shashikant@gmail.com

No comments:

Post a Comment