'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 30 August 2014

इंजिनिअर्ससाठी खुला होतोय Appropriate Technology चा मार्ग

‘डॉक्टरांनी रुग्ण तपासले तरी ती सामाजिक सेवा होते. पण आम्ही सामजिक योगदान कसे द्यावे?’ असा प्रश्न निर्माणच्या इंजिनिअर मित्र-मैत्रिणींना बरेचदा पडतो. निरंजन तोडरमल (निर्माण ५) व महेश लादे (निर्माण ४) यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधताना ग्रामीण भागातील प्रश्न Appropriate Technology मदतीने सोडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

निरंजन मुंबईच्या सायन्स फॉर सोसायटी (S4S) ह्या संस्थेमध्ये रुजू झाला आहे. हळदीवर प्रक्रिया करण्याचे उपकरण, सौर ड्रायर, गरोदर महिलांसाठी मोबाइल application, वीजमुक्त जलशुद्धीकरण उपकरण अशी विविध उपकरणे संस्थेने या आधी बाजारात आणली आहे. निर्माणचा अश्विन पावडे ह्याच संस्थेमध्ये कार्यरत आहे. 

निरंजनचे काम हे जलशुद्धिकरणाच्या एका नवीन टेक्नोलोजीवर असणार आहे. वेपर (वाफ) प्रेशर मध्ये फरक निर्माण करून, अशुद्ध पाण्याचे evaporation (बाष्पीभवन) तर दुसरीकडे शुद्ध पाण्याचे condensation (संघनन) निर्माण करायचे अशी हि टेक्नोलॉजी आहे. वेपर प्रेशरमध्ये फरक निर्माण करायला जरी विजेच्या पंपाचा वापर करण्यात येणार असला, तरी त्याला लागणारी वीज अत्यंत कमी आसणार आहे. ह्या उपकरणाच्या डिझाइनचे काम निरंजनचे असणार आहे. 

            S4S बद्दल अधिक माहितीसाठी: http://scienceforsociety.co.in/
*****
महेश लादेला त्याच्या गावातील मुलांनी शिक्षणासाठी, नोकरीसाठी गाव सोडून जाणे, ही गोष्ट नेहमीच खटकायची. त्याच्यावर उपाय म्हणून गावातंच चांगले शिक्षण उपलब्ध असावे असे महेशला वाटले. म्हणूनच त्याची cognizant ह्या कंपनीतील नोकरी सोडून, महेशने चांगले शिक्षण म्हणजे काय हे नेमके समजून घेण्यासाठी ‘प्रथम’ ह्या संस्थेत काम सुरु केले. त्याच काळात महेशच्या असे लक्षात आले की केवळ चांगले शिक्षण पुरेसे नाही, तर गावातील विस्थापन थांबवायचे असल्यास, हाताला काम देखील गरजेचे आहे. म्हणून महेशने काही काळ ‘विज्ञान आश्रम’ ह्या संस्थेसोबत देखील काम केले. ह्याचाच पुढचा टप्पा म्हणून महेश ‘बायफ’ संस्थेसोबत, ‘महानेत्रा’ ह्या प्रकल्पावर काम करीत आहे. 

महानेत्रा हा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान महामंडळा अंतर्गत येणारा प्रकल्प असून, ग्रामीण भागांमध्ये गरजेचे असणारे तंत्रज्ञान उपलब्ध कारण देणे हा ह्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश्य आहे. सध्या बायफ संस्थेमार्फत हा प्रकल्प यवतमाळ, पंढरपूर, जव्हार व उरुळीकांचन येथे राबविण्यात येत आहे. तेथील गावांमधील प्रश्न समजून घेणे, त्यांच्यावर उपयुक्त असे तंत्रज्ञान शोधणे, ते त्या गावांसाठी बदलणे, ते तंत्रज्ञान तेथील लोकांना शिकवणे, त्याचे आर्थिक मॉडेल विकसित करणे असे महेशच्या कामाचे स्वरूप असणार आहे. तसेच गावातील उद्योजकता वाढीस लावणे, मार्केटशी संबंध प्रस्थापित करणे, हे देखील ह्या प्रकल्पाचे एक उद्देश्य आहे.
‘महानेत्रा’ या प्रकल्पाबद्दल अधिक माहितीसाठी:


निरंजन व महेशला त्यांच्या नवीन कामासाठी शुभेच्छा !
                          स्त्रोत- निरंजन तोडरमल, niranjantoradmal1@gmail.com
                                                   महेश लादे,  maheshld96@gmail.comNo comments:

Post a Comment