'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 30 August 2014

चिन्मय वराडकरचे जालन्यातील पाणीप्रश्नावर काम सुरु

चिन्मय वराडकरने (निर्माण ४) नुकताच M.Sc. Geology (भूविज्ञान) हा अभ्यासक्रम नांदेड विद्यापीठातून पूर्ण केला. त्याचे B.Sc देखील ह्याच विषयात पूर्ण झालेले आहे. समाजात सध्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे हे समजून, आपले Geology चे ज्ञान त्याकरिता उपयुक्त ठरू शकेल ह्याची त्याला जाणिव झाली. म्हणुन ठरवून चिन्मय ने इतर विषयात post graduation न करता Geology मध्येच पुढे अभ्यास करणे पसंत केले. पाण्याचा प्रश्न तीव्र असणाऱ्या जालना शहरात चिन्मय ने ‘WOTR’ (Watershed Organisation Trust) ह्या संस्थे मार्फत काम करण्यास सुरुवात केली आहे.
            WOTR ही संस्था गेली अनेक वर्ष भारतातील ६ राज्यांमध्ये (महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, ओडिशा) watershed development चे काम करीत आहे. जालना जिल्ह्यामध्ये सध्या जाफराबाद, अंबड व भोकरदन ह्या क्लस्टर्स मध्ये त्यांचे काम सुरु आहे. शेतावर रोजगार हमी मार्फत बांध बांधणे, जेणेकरून पावसाचे पाणी अडेल व जमिनीत मुरेल, असे ह्या कामाचे स्वरूप आहे. ह्यात महाराष्ट्र शासन, हिंदुस्तान लिव्हर व ITC (आर्थिक मदत) व WOTR (तंत्रज्ञान सहाय्य) असे सहभागी आहेत. एकुण २८ गावांमध्ये हे काम सध्या सुरू आहे. चिन्मय हा सध्या जाफराबाद येथे कार्यरत असून, कामांवर देखरेख करणे, तंत्रज्ञानासंदर्भात सहाय्य करणे इत्यादी कामे तो करत आहे.
चिन्मयला नवीन कामासाठी शुभेच्छा ! 

स्त्रोत- चिन्मय वराडकर, chinmayvaradkar@gmail.com

No comments:

Post a Comment