'अर्थपूर्ण जीवनाचा समाजात शोध' घेण्यासाठी २००६ साली डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी तरुणांसाठी विकसित केलेली शिक्षणप्रक्रिया म्हणजे 'निर्माण'...

समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी विविध समस्यांचे आव्हान स्वीकारणा-या व त्याद्वारे स्वत:च्या आयुष्याचा अर्थ शोधू इच्छिणा-या युवा प्रयोगवीरांचा हा समुदाय...

'मी व माझे' याच्या संकुचित सीमा ओलांडून,त्यापलीकडील वास्तवाला आपल्या कवेत घेण्यासाठी स्वत:च्या बुद्धीच्या,मनाच्या व कर्तृत्वाच्या कक्षा विस्तारणा-या निर्माणींच्या प्रयत्नांचे संकलन म्हणजे "सीमोल्लंघन"!

गेल्या तीन महिन्यातील निर्माणींच्या धडपडींचे थोडक्यात पण नेमके वृत्त आपल्यासाठी घेऊन येतील अमोल amolsd07[at]gmail[dot]com आणि सतीश गिरसावळे girsawale.sg[at]gmail[dot]com व सीमोल्लंघन टीम!

निर्माणबद्दल अधिक माहितीसाठी - http://nirman.mkcl.org; www.facebook.com/nirmanforyouth

Saturday, 30 August 2014

माविम फ़ेलोशिपसाठी ऋचा व सागर गडचिरोलीत दाखल!

ऋचा सावंत व सागर पाटील (निर्माण ५) हे जून २०१४ पासून ‘महिला आर्थिक विकास महमंडळ’ (माविम) गडचिरोली येथे पुढील एक वर्षासाठी काम करण्यास रुजू झाले आहेत.
गडचिरोली मध्ये असलेल्या महिला बचत गटांसोबत माविमचे काम चालू आहे. या बचत गटांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी मदत करणे, तसेच जे विविध प्रकारचे छोटे छोटे product बनविले जातात (उदाहरणार्थ – शतावरीची पावडर, जांभळाचा रस, जांभळाचा जॅम, जांभूळबियांची पावडर, तांदळाचे पापड, हळदीचे लोणचे, खते, इत्यादी ), या उत्पादनांना योग्य बाजार पेठ उपलब्ध करून देणे, हे या दोघांच्या कामाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
पहिल्या एका महिन्यादरम्यान दोघांचा गडचिरोलीच्या विविध भागातील बचत गटाना भेट देणे त्यांच्या अडचणी समजून घेणे असा अभ्यास चालू होता. यादरम्यान त्यांना असे लक्षात आले की महिला वेगवेगळ्या वस्तू तयार करत आहेत, परंतु तयार केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी लागणारी कौशल्ये त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे महिलांचा कौशल्य-विकास करण्यासाठी मदत करणे, त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे आणि उद्योग करण्यासाठी प्रवृत्त करणे असे दोघांच्या कामाचे स्वरूप असेल.
दोघानांही या नव्या आव्हानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
स्रोत: ऋचा सावंत,  richa.sawant12@gmail.com,

सागर पाटील, sgpatil4587@gmail.com

No comments:

Post a Comment